---Advertisement---

‘भारताचा बिलिनियर’ जयदेव उनाडकट यंदा मुंबईच्या ताफ्यात दाखल, पण किंमत मात्र घसरली

Jaydev Unadkat
---Advertisement---

मार्च महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी जयदेव उनाडकट याला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली.

भारताच्या या ३० वर्षीय वेगवान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाल्या नाहीत. परंतु देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याने आपली प्रतिभा दाखवली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही त्याला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरस पाहायला मिळणे साहजिक होते. परंतु ‘भारताचा बिलिनियर खेळाडू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उनाडकला यंदा जास्त मोठी बोली लागली नाही. मुंबई इंडियन्सने त्याला १ कोटी ३० लाखांना विकत घेतले आहे. तो ७५ लाखांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. 

सन २०१८ च्या आयपीएलमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा भारतीय खेळाडू म्हणजे जयदेव उनाडकट. त्याच्या कामगिरीमुळे २०१८मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला ११ कोटी ५० लाखांना संघात घेतले होते. यासह तो आयपीएलच्या ११व्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. पण त्याचे प्रदर्शन चांगले न राहिल्याने त्याला पुन्हा लिलावाला सामोरे जावे लागले.

तरी, २०१९मध्ये परत राजस्थान रॉयल्सने त्याला ८ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले आणि तो आयपीएलच्या १२व्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता. म्हणूनच त्याला भारताचा बिलिनियर खेळाडू म्हटले जाते.

उनाडकटने आतापर्यंत आयपीएलमध्ये ८६ सामने खेळले असून ८५ विकेट्स घेतल्या आहेत. आता तो मुंबई इंडियन्सकडून कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

खलील अहमदसाठी उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सने ओतला पैसा, पाहा किती रुपयांना केले खरेदी?

अनुभवी ऑलराऊंडर्स अनसोल्ड तर नवख्या खेळाडूंनी केली कोट्यावधींची कमाई! पाहा संपूर्ण यादी

IPL Auction: भारताविरुद्ध दमदार कामगिरी करणारा ओडियन स्मिथ पंजाब संघात दाखल; एवढ्या कोटींची लागली बोली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---