---Advertisement---

IPL Auction: भारताविरुद्ध दमदार कामगिरी करणारा ओडियन स्मिथ पंजाब संघात दाखल; एवढ्या कोटींची लागली बोली

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 1:10 PM
Odean-Smith
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला काही दिवसात सुरुवात होणार आहे. या हंगामासाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल लिलाव पार पडला. या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना मोठ्या किमतीच्या बोली लागल्या आहेत. यामध्ये ओडियन स्मिथ या खेळाडूंलाही कोट्यावधी रुपयांची बोली लागली.

स्मिथवर पंजाब किंग्सने ६ कोटी रुपयांची बोली लावली आहे. त्यामुळे तो यावेळी पंजाब संघाकडून खेळताना दिसेल. स्मिथ वेस्ट इंडिजचा खेळाडू असून त्याने नुकत्याच भारताविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. त्याने यापूर्वी आयपीएल स्पर्धा खेळलेली नाही. त्यामुळे त्याचे या हंगामातून आयपीएल पदार्पण होऊ शकते.

ओडियन स्मिथला ३३ टी२० सामन्यांचा अनुभव असून त्याने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. स्मिथपूर्वी पंजाबने लियाम लिव्हिंगस्टोनला ११ कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL Auction: भारताविरुद्ध दमदार कामगिरी करणारा ओडियन स्मिथ पंजाब संघात दाखल; एवढ्या कोटींची लागली बोली

हे माहितंय का? सर्व फ्रँचायझींकडून ‘या’ दिग्गजांनी लावल्या बोली, पाहा काव्या मारनपासून नीता अंबानीपर्यंतची यादी

IPL Auction | रेकॉर्डब्रेक बोली घेत ‘लियाम लिविंगस्टोन’चा पंजाबच्या ताफ्यात दिमाखात प्रवेश!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---