भारताचा बांगलादेश दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यावर भारताला टी20 आणि एकदिवसीय मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, कसोटी मालिकेेत भारतााने बांगलादेश संघाला 2-0ने व्हाईटवॉश दिला. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात जयदेव उनाडकट याचा समावेश केला होता. यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने तब्बल 12 वर्षांनी संघात पुनरागमन केले. हा सामना संपल्यानंतर उनाडकट याने आपल्या इंस्टाग्रां अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला, ज्यात त्याने आपल्या 12 वर्षाआधीची जर्सी आणि बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या सामन्यातील जर्सी यांचा फोटो होता.
जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याने आपले कसोटी पदार्पण 16 डिसेंबर 2010 या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध केले होते. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. तब्बल 12 वर्षांनी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळाले. या दोन्ही सामन्यांच्या आठवणीत त्याने एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याच्या दोन जर्सी आहेत. पहिली जर्सी 2010मध्ये खेळलेल्या सामन्याची आहे आणि दुसरी जर्सी 2022मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या सामन्याची आहे. या दोन्ही जर्सींवर त्या-त्या सामन्यांमध्ये खेळलेल्या खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत. या दोन्हीवेळी भारताचा एक खेळाडू सामाईक आहे. तो म्हणजे उमेश यादव (Umesh Yadav). उमेश यादव हा दोन्ही सामन्यात खेळलेला होता. त्यामुळे जयदेवच्या या फोटोखाली एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली की उमेश यादव तुझ्यासाठी लकी व्यक्ती आहे.
बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या या कसोटी सामन्यात त्याने बांगलादेशच्या पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. फलंदाजीत त्याने पहिल्या डावात नाबाद 14 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याला नाईट वॉचमनच्या भुमिकेत मैदानावर पाठवण्यात आले, तेव्हा त्याने 13 धावा केल्या. या डावात त्याने एक उत्तुंग षटकार देखील लगावला. उनाडकटला पुढेही संधी देण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईसाठी खेेळताना दिसणार खान ‘ब्रदर्स’, सरफराझ खानच्या भावानेही केले पदार्पण
‘धोनी भाईशी माझी तुलना होते, तेव्हा मी…’, बांगलादेशचे मैदान मारणाऱ्या ईशान किशनची खास प्रतिक्रिया