---Advertisement---

जेमिमाह रोड्रिगेज अन् स्म्रीती मंधानानी जिंकली मने, मैदानाबाहेर घडवले खिलाडूवृत्तीचे दर्शन

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 3:21 PM
Smriti-Mandhana-Jemimah-Rodriques
---Advertisement---

सध्या भारतीय महिला संघ बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत आहे. यावेळी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारतीय महिला संघाने तीन सामने खेळले आहेत. यांपैकी पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पुढचे दोन सामने जिंकत संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. याशिवाय भारतीय खेळाडू आपल्या चांगल्या वर्तवणूकीमुळे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

भारतीय महिला क्रिकेट संघाची फलंदाज जेमिमाह रॉड्रिगेज अनेकदा सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळते. याही वेळेस जमिमाहने केलेल्या पोस्टवर चाहते भलतेच खूश झाल्याचे दिसून येत आहे. मुळात भारतीय संघाने स्पर्धेतील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात बार्बाडोस संघाला पराभूत करत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर जेमिमाह आणि स्म्रीती मंधाना यांनी इतर खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. याभेटीचे फोटो जेमिमाहने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/Cg2F3Zfqpry/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोमध्ये भारतीय संघाची फलंदाज जेमिमाह भारतीय हॉकी संघासोबत वेळ घालवत त्यांना विजयासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे.

Smriti-jemimah-With-niranjan
Screengrab: Instagram

या फोटोमध्ये भारतीय फलंदाज जेमिमाह आणि भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना ही भारताचे प्रतिनिधीत्व करणारा जलतरणपटू निरंजन मुकुंद याच्यासोबत वेळ घालवताना आणि त्याला कामगिरीसाधी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

Jemimah-With-Savita-Punia
Screengrab: Instagram

याफोटोमध्ये जेमिमाह ही भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार आणि गोलकिपर सविता पुनिया हिच्यासोबत आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

दरम्यान, भारतीय महिला संघाने यंदाच्या कॉमनवेल्थ मध्ये सेमीफायनलमध्ये धडक मारली असून यावेळी भारताला बलाढ्य इंग्लंडला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू विशेष प्रयत्नदेखील करताना दिसत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर परतला फॉर्म, मॉर्गनने १६२च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा

‘आशिया कप आणि टी२० विश्वचषकांत कोण असेल कर्णधार रोहितचा जोडीदार?’, माजी दिग्गजाने स्पष्टचं सांगितलं

CWG 2022: श्रीशंकरची ऐतिहासिक कामगिरी! लांब उडीत सिल्वर जिंकणारा पहिलाच भारतीय पुरूष ऍथलेटिक्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---