ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटर शेन वॉर्न आणि वाद ही नवी बाब नाही. कधी मैदानावरील त्याचे असभ्य वर्तनामुळे तो चर्चेत राहिला, तर कधी महिलांना सोबत केलेल्या गैरवर्तवणूकीमुळे. हेच नाही तर तो आपल्या वादग्रस्त विधानांमुळे तर हमखास चर्चेत राहतो. आता शेन वॉर्न पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ऑस्ट्रेलियन रिऍलिटी टीव्ही स्टार जेसिका पॉवरने त्याच्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे.
शेन वॉर्नच्या वागणुकीबद्दल महिलेने तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वॉर्न आपल्या वर्तवणूकीमुळे वादात आणि चर्चेत राहिला आहे. जेसिका पॉवर म्हणाली की तिला आता समजले आहे की वॉर्न पुन्हा पुन्हा का अडचणीत येत असतो. जेसिकाने वॉर्नला विचित्र म्हटले आहे. ती म्हणाली की, जेव्हा मी वॉर्नला सांगितले की, तू मला पाठवत असलेला मेसेज योग्य नाही, तेव्हा त्याने प्रत्यक्षात ‘एक्स-रेटेड’ मेसेज पाठवायला सुरुवात केली.
ती पुढे म्हणाली, ‘त्या आठवड्यात जेव्हा शेन वॉर्न माझ्या इनबॉक्समध्ये संदेश पाठवत होता, तेव्हा ते खूप विचित्र होते. तो एक वेडा माणूस आहे. त्याने मला पाठवलेल्या काही गोष्टी माझ्या दृष्टीने अत्यंत चुकीच्या होत्या. जेव्हा मी त्याला थोडेसे उत्तर दिले, तेव्हा त्याने खरोखरच एक्स-रेट केलेल्या गोष्टी पाठवायला सुरुवात केली. मला वाटतं हे खूप चुकीचं आहे. प्रत्येक वेळी तो कसा अडचणीत येतो, याचे आश्चर्य नाही.’
जेसिका पॉवर म्हणाली, ‘मी म्हणाली हा वेडेपणा आहे. मला वाटले, तो असे संदेश पाठवत आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही.’
वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याला जगातील महान लेग स्पिनर म्हटले जाते. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ विकेट आहेत. त्याचबरोबर त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९३ विकेट्स घेतल्या आहेत.
वॉर्न त्याच्या वागण्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. त्याची जीवनशैली त्याला अनेकदा वादात टाकते. ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याने एक वर्षाची बंदीही घातली होती. आता, जेसिका पॉवरचे आरोप ही त्याच्यावरील आरोपांमध्ये नवीन भर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहली झाला ३३ वर्षांचा! क्रिकेट जगतातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव, पाहा खास ट्वीट्स
‘विक्रमवीर’ विराटचा वाढदिवस, बीसीसीआय शेअर केला खास व्हिडिओ
टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोण पोहोचणार आणि कोण जिंकणार? सेहवागने केली भविष्यवाणी