इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जॉनी बेअरस्टो मागील महिन्यात गोल्फ खेळताना अचानकपणे पडल्याने दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेले. बेअरस्टोचा डावा पाय फ्रॅक्चर झालेला. तसेच घोटाही निखळलेला. नुकतीच त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून त्या दुखापतीचे गांभीर्य जगजाहीर केले आहे.
बेअरस्टोने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘माझा पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे आणि माझा घोटा देखील निखळला आहे, ज्यासाठी ऑपरेशन आवश्यक होते. सध्या दोन्ही पायांवर उभे राहणे आणि सर्व काही ठीक आहे याची खात्री करून घेणे, माझे प्राथमिक लक्ष आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि पाठिंबा असाच मिळत राहो.’
https://www.instagram.com/p/CjQyxF3N4Iy/?igshid=YmMyMTA2M2Y=
दुखापत झाल्याच्या एका आठवड्यानंतर बेअरस्टोवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर हे निश्चित झाले होते की, पुढच्या वर्षापर्यंत मैदानात येऊ शकणार नाही. विशेष म्हणजे त्याला जेव्हा ही दुखापत झाली, त्याच्या केवळ काही तास आधीच त्याची टी20 विश्वचषकासाठी इंग्लंड संघात निवड झाली होती. मात्र, या दुखापतीमुळे त्याचे वर्ल्ड कप तिकीट हुकले. जोफ्रा आर्चरनंतर वर्ल्ड कपला मुकणारा तो इंग्लंडचा दुसरा महत्त्वपूर्ण खेळाडू बनला.
टी20 क्रिकेटचा आदर्श फलंदाज मानला जाणारा बेअरस्टो यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने 6 सामन्यात 75.66 च्या सरासरीने 681 धावा केलेल्या. यादरम्यान त्याने चार शतके आणि एक अर्धशतक झळकावलेले. त्याने न्यूझीलंडविरुद्ध चार आणि भारताविरुद्ध एक शतके झळकावली होती. त्याच्या धडाकेबाज शतकांमुळे इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला होता. तसेच भारताविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवलेली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ढगाळ वातावरणात खेळला जाणार तिसरा टी-20 सामना, वाचा पावसाविषयीचा अंदाज
महिला टी20 विश्वचषक 2023 चं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये