भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. साउथॅम्प्टनच्य रोज बाउल स्टेडियममध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. २००० मध्ये जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्यांचे हे केवळ दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. या विजयानंतर न्यूझीलंडचे चाहते आनंदाने बेभान झाले. मात्र, या चाहत्यांनी जल्लोषाची पातळी ओलांडल्याने न्यूझीलंडचा क्रिकेटपटू संतापला आहे.
न्यूझीलंडच्या चाहत्यांनी ओलांडली मर्यादा
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे खेळाडू व चाहते नेहमी आपल्या खिलाडूवृत्ती व शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, न्यूझीलंडच्या विजयानंतर चाहत्यांकडून आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो असा प्रकार पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या चाहत्यांच्या या वाईट वागण्याबद्दल अष्टपैलू जिमी नीशमनेही दिलगिरी व्यक्त केली आहे. भारतावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विजय मिळविल्यानंतर न्यूझीलंडच्या चाहत्यांनी त्यांचे टी-शर्ट काढून त्यांना हवेत फडकावण्याला सुरूवात केली आणि आता त्यांच्या या वागण्यावर टीका होत आहे.
नीशामने व्यक्त केली दिलगिरी
एका भारतीय चाहत्याने न्यूझीलंडच्या चाहत्यांच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तेव्हा जिमी नीशमनेही या गैरवर्तनबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्या भारतीय चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना नीशमने लिहिले की, ‘हो, या घृणास्पद वर्तनाबद्दल मला नक्कीच वाईट वाटते. लक्ष वेधण्यासाठी टी-शर्ट काढून ते भिरकावण्याचे धाडस करूच कसे शकतात?’ या ऐतिहासिक सामन्याच्या अंतिम सामन्यात चाहत्यांनी केलेल्या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
Yes I apologise for this absolutely disgusting behaviour. How dare people *checks notes* wave their t-shirts around https://t.co/zjSDFrZ8RW
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) June 24, 2021
न्यूझीलंडने जिंकली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप
प्रथमच आयोजित झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दोन्ही डावात उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताला रोखण्याचे काम केले होते. त्यानंतर अखेरच्या सत्रात न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे आव्हान मिळाले असताना कर्णधार केन विलियम्सन व अनुभवी रॉस टेलर यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला या इतिहासिक सामन्यात विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या –
ये तो होना ही था! भारताचा पराभवानंतर मांजरेकरांनी जडेजावर साधला निशाणा, पाहा काय म्हणाले
लवकरच तुटणार कोहली-शास्त्रींची जोडगोळी, ‘या’ टूर्नामेंटमधील कामगिरीवर ठरणार भवितव्य