इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट (Joe Root) कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. जो रूटचा फॉर्म पाहता इंग्लंडचा तो सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकाॅर्ड मोडीत काढू शकतो. अशा चर्चा होत आहेत. रूटचा समावेश फॅब-4 मध्ये आहे, ज्यामध्ये रूट व्यतिरिक्त कोहली, विल्यमसन, स्मिथ आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू जिमी नीशमने (James Neesham) रूट आणि कोहली यांच्यातील तुलनेवर आपले मत मांडले आहे.
इंडिया डॉट कॉमशी विशेष संवाद साधताना जेम्स नीशमने क्रिकेटशी संबंधित अनेक गोष्टींवर आपले मत व्यक्त केले. त्याला विचारण्यात आले की, “तुम्ही जगभरातील विविध लीगमध्ये भरपूर टी20 आणि टी10 क्रिकेट खेळला आहात, जिम एफ्रो टी10 लीगची इतर स्पर्धांशी तुलना कशी होते?” त्यावर तो म्हणाला, “साहजिकच ही उच्च धावसंख्येची स्पर्धा आहे. चांगल्या विकेट्स आणि खेळाडूंमुळे आम्हाला एक संघ म्हणून यश मिळाले आहे.”
पुढे त्याला विचारण्यात आले की, “फॅब फोर’ पैकी सर्वात मोठे जागतिक रेकाॅर्ड कोणाच्या नावे होतील असे तुम्हाला वाटते? त्यावर निशम म्हणाला, “जो रूट की विराट कोहली? कसोटी क्रिकेटमध्ये, रूट इंग्लंडसाठी खूप कसोटी खेळतो, तो याक्षणी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, कसोटी क्रिकेटमध्ये अर्थातच तो रूट आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली आणि पंतमध्ये पुन्हा वाद! धाव काढताना गोंधळ उडाल्याने थोडक्यात बचावला विराट, मग…
षटकारांचा पाऊस पाडत टीम इंडियानं केला वर्ल्ड रेकॉर्ड, कसोटीत असं कधीच घडलं नाही!
कोहलीच्या बॅटची जादू, आकाश दीपनं क्रिजवर येताच ठोकले खणखणीत षटकार!