बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात बुधवारी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 25 वा सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 4 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयात कर्णधार केन विलियम्सनने 106 धावांची नाबाद शतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाने पावसामुळे 49 षटकांचा करण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 6 बाद 241 धावांवर रोखण्यात यश मिळवले होते.
न्यूझीलंड गोलंदाजी करत असताना विलियम्सनने न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू जिमी निशामला एकही षटक गोलंदाजी करण्यासाठी दिले नाही. त्यामुळे निशामने विलियम्सनला गमतीने इंस्टाग्रामवर मजेदार पोस्ट शेअर करत ट्रोल केले आहे.
विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या या सामन्याआधी झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात निशामने 5 विकेट्स घेतल्या होत्या.
निशामने इंस्टाग्रामवर विलियम्सनचा धक्का बसल्याप्रमाणे भावना असलेला एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोला गमतीशीर कॅप्शन दिले आहे.
त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की ‘जेव्हा तूम्हाला समजते की तूम्ही निशामला गोलंदाजी द्यायला पूर्णपणे विसरला. पण खरंच चांगला आहे हा व्यक्ती?’ या पोस्टवर विलियम्सनने प्रतिक्रीया देताना इमोजीचा वापर केला आहे.
https://www.instagram.com/p/By5_OIvBYBN/
निशामला जरी या सामन्यात गोलंदाजी मिळाली नसली तरी त्याने न्यूझीलंडकडून 242 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विलियम्सनला फलंदाजीत चांगली साथ दिली. त्याने विलियम्सनबरोबर पाचव्या विकेटसाठी 57 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचताना 23 धावांची खेळी केली होती.
त्याचबरोबर न्यूझीलंडकडून निशाम बाद झाल्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने 60 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली होती. न्यूझीलंडने 242 धावांचे आव्हान 48.3 षटकात 6 बाद 245 धावा करत सहज पार केले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामन्यात घडला इतिहास; विश्वचषकात पहिल्यांदाच झाले असे
–युवराज सिंग आता खेळणार या स्पर्धेत!
–बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी करत डेव्हि़ड वॉर्नरने केली किंग कोहलीच्या विक्रमाची बरोबरी