इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताचा धावपटू जीन्सन जॉन्सनला पुरूषांच्या 1500 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच त्याने मंगळवारी (28 आॅगस्ट) पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.
या शर्यतीत जॉन्सनने 3 मिनिट 44.72 सेकंदाची वेळ नोंदवली. तब्बल 56 वर्षानंतर भारताला या प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे.1962ला मोहिंदर सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते. तर भारताचा धावपटू मनजीत सिंग या शर्यतीत 3 मिनिटे 46.57 सेंकदाने चौथ्या स्थानावर राहिला.
जॉन्सनने शेवटच्या 100 मीटरमध्ये वेग वाढवत इरानच्या आमिर मोरादी आणि बहरिनच्या तिऔली मोहमद यांना पिछाडीवर टाकत ही सुवर्ण कामगिरी केली.
तसेच त्याने यावर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत 1500मीटरच्या शर्यतीत बहादूर प्रसादचा विक्रम मोडला होता. यावेळी त्याने 3 मिनिटे 37.86 सेंकदात शर्यत पूर्ण केली होती.
Here's the GOLD number SIX for #TeamIndiaAthletics at #AsianGames2018 #JJ Jinson Johnson wins men's 1500m Final in style with the timing of 3:44.72
What a run in that last lap #JJ, simply superb!!@IndiaSports @g_rajaraman @Media_SAI @IndiaSports @Ra_THORe @asiangames2018 pic.twitter.com/ozEjtHAThA
— Athletics Federation of India (@afiindia) August 30, 2018
जॉन्सनने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे भारताचे या स्पर्धेत12 सुवर्णपदक झाले आहेत. यामुळे भारताने 2014चा 11 सुवर्णपदकांचा विक्रम मोडला आहे.
भारताने अॅथलेटिक्समध्ये आत्तापर्यंत 18 पदके मिळवली आहेत. यात 7 सुवर्ण, 10 रौप्य आणि 2 कांस्यपदके मिळवली आहेत. तसेच एकूण 59 पदके मिळवली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स: भारतीय पुरूष हॉकी संघाच्या अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात
–एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश
–एशियन गेम्स: ८०० मीटर शर्यतीत भारताची सुवर्ण आणि रौप्य कामगिरी