पुणे। महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत एकेरीच्या विजेतेपदासाठीच्या लढतीत झेकियाच्या जिरी वेस्ली याने आठव्या मानांकीत बेलारूसच्या आठव्या मानांकीत एगोर गेरासीमोव्ह याचा(8) 7-6(2), 5-7, 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
दुहेरी गटात इंडोनेशियाच्या ख्रिस्तोफर रुंगकॅट व स्वीडनच्या आंद्रे गोरसन यांनी इस्त्राईलच्या जोनाथन एर्लिच व बेलारूसच्या आंद्रे वासिलेव्हस्की या तिस-या मानांकीत जोडीचा 6-2, 3-6, 10-8 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीच्या लढतीत 2 तास 12 मिनिट चाललेल्या उत्कंठावर्धक सामन्यात 26 वर्षीय जागतिक क्रमांक 107 असलेल्या झेकियाच्या जिरी वेस्ली याने आठव्या मानांकीत जागतिक क्रमांक 90 असलेल्या 27 वर्षीय बेलारूसच्या आठव्या मानांकीत एगोर गेरासीमोव्ह याचा 7-6(2), 5-7, 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये बाराव्या गेमपर्यंत 6-6 असा बरोबरीत राहील्याना टायब्रेक झाला.
टायब्रेकमध्ये वेस्लीने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत एगोरला कोणतीही संधी न देता पहिला सेट टायब्रेकमध्ये 7-6(2) असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेटही चुरशीचा झाला. दुसरा सेट दहाव्या गेमअंती 5-5 असा बरोबरीत असताना आकराव्या गेममध्ये एगोर गेरासीमोव्ह याने जिरी वेस्लीची सर्व्हिस भेदली व बाराव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत दुसरा सेट 7-5 असा जिंकत सामन्यात आपले आव्हान कायम राखले व सामना 1-1 असा बरोबरीत आला.
तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये झेकियाच्या जिरी वेस्ली जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या गेममध्ये जिरी वेस्लीने स्वतःची सर्व्हिस राखली व दुस-या गेममध्ये एगोर गेरासीमोव्हची सर्व्हिस भेदली व पुढच्या तिस-या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत 3-0अशी आघाडी घेतली. घेतलेली आघाडी कायम राखत एगोरला कोणतीही संधी न देता पुढच्या स्वतःच्या सर्व सर्व्हिस राखत जिरीने तिसरा सेट 6-3 असा एकतर्फी लढतीत जिंकत आठव्या मानांकीत एगोर गेरासीमोव्ह याचा 7-6(2), 5-7, 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
विजेतेपदानंतर जिरी वेस्ली म्हणाला, भारतात पुन्हा खेळायला येऊन खुप आनंद झाला. पुण्यातील चाहत्यांनी उदंड प्रतिसाद व प्रेम दिले. भविष्यातील स्पर्धांमध्येही अशीच कामगिरी करत राहील.
दुहेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत इंडोनेशियाच्या ख्रिस्तोफर रुंगकॅट याने स्वीडनच्या आंद्रे गोरसन याच्या साथीत इस्त्राईलच्या जोनाथन एर्लिच व बेलारूसच्या आंद्रे वासिलेव्हस्की या तिस-या मानांकीत जोडीचा 6-2, 3-6, 10-8 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये विजेत्या ख्रिस्तोफर रुंगकॅट व आंद्रे गोरसन जोडीने जोनाथन एर्लिच वआंद्रे वासिलेव्हस्की यांची तिस-या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदत पहिला सेट 6-2 असा सहज जिंकला.
दुस-या सेटमध्ये जोनाथन एर्लिच वआंद्रे वासिलेव्हस्की जोडीने आपल्या खेळात परिवर्तन करत दुस-या सेटच्या चौथ्या गेममध्ये जोनाथन एर्लिच वआंद्रे वासिलेव्हस्की यांनी ख्रिस्तोफर रुंगकॅट व आंद्रे गोरसन यांची सर्व्हिस ब्रेक करत ४-१ अशी आघाडी घेतली. पाचव्या, सातव्या व नवव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत दुसरा सेट जोनाथन एर्लिच वआंद्रे वासिलेव्हस्की यांनी जिंकला.
तिस-या सेटमध्ये ख्रिस्तोफर रुंगकॅट व आंद्रे गोरसन यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत तीसरा सेट 10-8 असा जिंकत सामन्यात तिस-या मानांकीत जोडीवर 6-2, 3-6, 10-8 असा विजय मिळवत दुहेरीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. ख्रिस्तोफर रुंगकॅट व आंद्रे गोरसन यांचा या स्पर्धेतील हा पहिलाच सहभाग आहे. स्पर्धेतील विजयानंतर आम्ही आनंदी आहोत.
पहिला सेय जिंकल्यानंतर खेळात सुधारणा करत सामन्यात पकड राखण्याचा प्रयत्न केला व सामना जिंकला.रुंगकॅट म्हणाला ऑक्टोबरमध्ये गोरसनला दुहेरीचा साथीदार होशील का अशी विचारणा मी सोशल मिडीयातून केली होती. तेव्हा त्याने आशियायी स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी उत्साही असल्याचे सांगीतले.
स्पर्धेत एकूण 546,355/- अमेरिकन डॉलरची रोख पारितोषिके देण्यात आली. एकेरीतील विजत्या जिरी वेस्ली याला करंडक व 91,625/-अमेरिकन डॉलर व 250एटीपी गुण, तर उपविजेत्या एगोर गेरासीमोव्ह याला करंडक व 50,710/-अमेरिकन डॉलर व 150गुण अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे क्रिडा व युवा कल्याण मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएमआरडीएचे संजय खंदारे, संयोजन समितीचे सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र सरकारच्या एफडीए कमिशनर पल्लवी दराडे, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार,
टाटा ओपन महाराष्ट्रविषयी।
दि टाटा ओपन (मॅकडोवेल ओपन, गोल्ट फ्लेक ओपन आणि चेन्नई ओपन) ही दक्षिण आशियात होणारी एटीपी मालिकेतील एकमेव टेनिस स्पर्धा आहे. ही स्पर्धा पुण्यात होत असून, ही स्पर्धा एटीपी मालिका 250 या श्रेणीतील आहे. सर्व प्रथम ही स्पर्धा नवी दिल्ली येथे झाली. त्यानंतर चेन्नई येथे हलविण्यात आली. पुढे 2018 पासून ही स्पर्धा पुणे येथे होत आहे. स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आयएमजी करत आहे. एटीपी मालिकेतील भारतात होणारी एकमेव मोठी स्पर्धा आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट-अंतिम फेरी
जिरी वेस्ली (झेकिया) वि.वि एगोर गेरासीमोव्ह (बेलारूस)(8) 7-6(2), 5-7, 6-3
दुहेरी गट-अंतिम फेरी।
ख्रिस्तोफर रुंगकॅट (इंडोनेशिया) / आंद्रे गोरसन (स्वीडन) वि.वि जोनाथन एर्लिच (इस्त्राईल) / आंद्रे वासिलेव्हस्की (बेलारूस) (3) 6-2, 3-6, 10-8