मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आयपीएल स्पर्धेत एक-दोन नव्हे तर ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. येत्या काही महिन्यात आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी लिलाव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये युवा खेळाडूंवर अनेकांचे लक्ष लागून असणार आहे. अशातच २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणारा जितेश शर्मा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने महाराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ७ चेंडूंमध्ये नाबाद २८ धावांची खेळी केली होती. तर सिक्कीम संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २० चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी केली होती. तसेच मणिपूर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३१ चेंडूंमध्ये ७१ धावा ठोकल्या. त्याची ही तुफानी खेळी पाहून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की,आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलावात त्याच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते.
आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लीलावापूर्वी जितेशची तुफान फटकेबाजी
आयपीएल २०२२ स्पर्धेत २ नव्या संघांची एन्ट्री झाली आहे. तसेच या हंगामासाठी खेळाडूंचा मोठा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेवर देखील अनेकांचे लक्ष टिकून आहे. जितेशबद्दल बोलायचं झालं तर, २०१२-२०१३ मध्ये कूचबिहार ट्रॉफीच्या १२ डावात ५३७ धावा केल्यानंतर त्याची विदर्भच्या वरिष्ठ संघात निवड करण्यात आली होती.
जितेशने २०१३-२०१४ मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०१५-२०१६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा फलंदाज होता. त्याने १४३.५१ च्या स्ट्राइक रेटने ३४३ धावा केल्या होत्या. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
जितेशला २०१६ मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. त्यानंतर २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने जेतेपद मिळवले होते. त्यावेळी जितेशने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी ही ट्रायल दिली होती, जिथे त्याने सर्वांना प्रभावित केले होते. आरसीबीच्या सहाय्यक प्रशिक्षकाने त्याला चाचण्यांसाठी कुठेही जाऊ नको असे सांगितले होते. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला मूळ किमतीत खरेदी केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvsNZ: कधी, कुठे आणि कसा पाहाणार तिसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
‘रोहित-राहुल आहेत; मात्र, तिसरा सलामीवीर शोधावा लागेल’; भारतीय दिग्गजाने केले सावध
“चहलला अंतिम अकरात न खेळवणे मोठी चूक”; भारतीय दिग्गज भडकला