इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज जो डेन्लीने घरेलू क्रिकेटमध्ये ४१ शतके ठोकली आहेत. परंतु त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक ठोकता आले नाही. डेन्लीने १५ कसोटी, १६ वनडे आणि १२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. परंतु यादरम्यान चांगली कामगिरी करता न आल्यामुळे तसेच त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला इंग्लंड संघातून वगळले आहे. संघातून वगळल्यानंतर डेन्लीने मौन सोडत माध्यमांशी चर्चा करताना म्हटले आहे की, त्याला संघातून वगळण्याचा निर्णय योग्य होता.
डेन्लीने केले मोठे वक्तव्य
डेन्लीने म्हटले की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळल्यानंतर तो निराश झाला होता. परंतु त्याचा असा विश्वास आहे की संघाने घेतलेला हा निर्णय योग्य होता.
कसोटी संघातून वगळल्यानंतर डेन्ली म्हणाला, “नक्कीच मी खूप निराश झालो होतो. परंतु हा निर्णय योग्य होता. मला मोठ्या खेळी करण्यासाठी संधी मिळाल्या. परंतु मी त्याकडे जेव्हा पाहतो, तेव्हा हे सर्वात निराशाजनक वाटते. मला संधीचा फायदा घेता आला नाही. मी ३ किंवा ४ शतके ठोकू शकलो नाही. तसेच तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थानही पक्के करू शकलो नाही.”
मागील वर्षी कसोटीत पदार्पण करणाऱ्या डेन्लीने १५ कसोटी सामने खेळताना २९.५३ च्या सरासरीने ८२७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ही ९४ आहे. या धावा त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना केल्या होत्या.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने केवळ १८ आणि २९ धावांची खेळी केली होती. कर्णधार जो रूटने आपल्या मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्या कसोटीत पुनरागमन केल्यामुळे डेन्लीला त्या सामन्यात खेळता आले नाही. तसेच तो आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.
‘इव्हनिंग स्टँडर्ड’शी बोलताना डेन्लीने म्हटले, “मी सामने खेळत होतो. परंतु मोठ्या खेळी करत नव्हतो. मला वाटते की मी गोलंदाजांवर दबाव टाकत खेळले पाहिजे होते. मोठ्या खेळी न केल्यामुळे माझ्यावर दबाव आला होता. परंतु जोपर्यंत हे समजायचे, त्यावेळी क्रीजवरून बाद होत परतीचा मार्ग धरलेला असायचा.”
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी; तरीही ठोकले अर्धशतक
-किंग्ज ११ पंजाबचा त्रिशतकवीर खेळाडू कोरोनातून बरा, खेळणार आयपीएल २०२०
-कोहलीला लॉर्ड्सवर क्लिन बोल्ड करण्याची स्वप्ने पाहणारी कोण आहे ही महिला?
ट्रेंडिंग लेख–
-१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
-या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास






