इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूट न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे. लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या या सामन्यातील संघाच्या पहिल्या डावात रूटला विशेष खेळी करता आली नाही. तो फक्त ११ धावांवर बाद झाला. तरीही त्याने कसोटी क्रिकेटमधील एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
न्यूझीलंडच्या (NZ vs ENG) १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून रूटने (Joe Root) पुन्हा एकदा हताश केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने १५ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ११ धावा केल्या. या खेळीसह त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील आपल्या १ हजार धावा (One Thousand Runs Against NZ) पूर्ण केल्या आहेत. त्याने १४ कसोटी सामन्यांमधील २५ डावांमध्ये फलंदाजी करताना ही उपलब्धी मिळवली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध रूटने आतापर्यंत ४०.१२ च्या सरासरीने १००३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके आणि ५ अर्धशतके निघाली आहेत. न्यूझीलंडविरुद्ध त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी २२६ धावा इतकी आहे. हॅमिल्टन येथे त्याने ही खेळी केली होती.
सात देशांविरुद्ध १००० धावा करणारा चौथाच खेळाडू बनला रूट
याबरोबरच रूट सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड आणि ऍलिस्टर कूक यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये ७ देशांविरुद्ध १ हजार धावा करणारा फलंदाजही बनला आहे. रूटने न्यूझीलंडबरोबरच पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध १००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो हा पराक्रम करणारा जगातील चौथा आणि इंग्लंडचा दुसराच फलंदाज ठरला आहे.
दशहजारी बनण्याच्या जवळ आहे रूट
रूटने आतापर्यंत ११८ कसोटी सामन्यांमधील २१७ डावांमध्ये फलंदाजी करताना ९९०० धावा केल्या आहेत. त्यामुळे आता तो कसोटी क्रिकेटमधील आपल्या १० हजार धावांचा आकडा गाठण्यापासून फक्त १०० धावांनी मागे आहे. ३१ वर्षीय रूट न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान ही कमाल करू शकतो. असे झाल्यास, तो कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा जगातील चौदावा आणि एलिस्टर कूकनंतर इंग्लंडचा दुसराच फलंदाज बनेल.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वय वाढलं, पण धार गेली नाही! जेम्स अंडरसनने न्यूझीलंडच्या ४ विकेट्स घेत नावावर केला भीमपराक्रम
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद
लॉर्ड्समध्ये दिवंगत वॉर्नला दिली गेली खास श्रद्धांजली, २३ सेकंद स्टेडियममध्ये झाला टाळ्यांचा गजर