Joe Root Record: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात एक मोठा रेकाॅर्ड केला आहे. जो रूट आता इंग्लंडच्या वनडे इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. हा विक्रम त्याच्या नावावर करण्यासाठी त्याला 42 धावांची आवश्यकता होती आणि 17 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जस्टिन ग्रीव्हजच्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली तेव्हा त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. (Joe Root is the second highest run-scorer in England’s ODI history)
इंग्लंडचा विश्वचषक विजेता इऑन मॉर्गनने 225 सामन्यांच्या 207 डावांमध्ये 39.75च्या सरासरीने 6,957 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी जो रूटने 178 सामन्यांच्या 167 डावांमध्ये 6,916 धावा केल्या होत्या. यासह, जो रूट आता वनडे सामन्यात सर्वात जलद 7,000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. रूट या यादीत पाचव्या स्थानावर आहे आणि त्याने सौरव गांगुली, रोहित शर्मा, ब्रायन लारा सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. रूटने 168 डावांत 7,000 धावा केल्या. (Joe Root ODI Record)
या यादीत हाशिम आमला पहिल्या स्थानावर आहे, ज्याने 150 डावांत हा रेकाॅर्ड केला. तर केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 159 डावांत हा रेकाॅर्ड केला. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे आणि एबी डिव्हिलियर्स या यादीत चौथ्या स्थानावर आहे. कोहलीने 161 डावांत हा पराक्रम केला आहे, तर डिव्हिलियर्सने 166 डावांत हा पराक्रम केला आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कार्डिफमधील सोफिया गार्डन्स येथे खेळलेला सामना इंग्लंडने 3 विकेट्सने जिंकला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावून 308 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून केसी कार्टीने 103 धावा केल्या. तर शाई होपने
78 आणि ब्रँडन किंगने 59 धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंड एकेकाळी अडचणीत होते आणि त्यांनी 133 धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या, परंतु जो रूटने एका टोकाला सांभाळले आणि अखेर संघाला विजयाकडे नेले. जो रूट 166 धावा करून नाबाद राहिला. त्याच्याशिवाय विल जॅक्सने 49 धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रूकने 47 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना 3 विकेट्सने जिंकण्यात यश मिळवले. इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना २३८ धावांनी जिंकला होता. दुसऱ्या सामन्यातील विजयासह त्यांनी 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.






