आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे फार थोडे खेळाडू आहेत, ज्यांनी 20,000 धावांचा टप्पा गाठला. आता या लिस्टमध्ये इंग्लंडच्या जो रुटचं देखील नाव जोडल्या गेलं आहे. रुटनं पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत 262 धावांची खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 20,000 धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे आहे. त्यानं 417 डावांमध्ये ही कामगिरी केली. या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा आहेत. या दोघांनी 453 डावांमध्ये 20,000 धावा केल्या. रुट या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यानं 458 डावांमध्ये हा टप्पा गाठला. याशिवाय सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या बाबतीत रुटनं एबी डिव्हिलियर्सला मागे टाकलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्यानं आपल्या कारकीर्दीत एकूण 34357 धावा केल्या. दुसऱ्या क्रमांकावर कुमार संगकारा आहे, ज्यानं एकूण 28016 धावा केल्या. तिसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा लागतो, ज्याच्या नावे 27483 धावा आहेत. या लिस्टमध्ये विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, ज्यानं एकूण 27,041 धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानी श्रीलंकेचा महेला जयवर्धने आहे, ज्याच्या खात्यात 25957 धावा आहेत.
6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या स्थानावर अनुक्रमे जॅक कॅलिस (25534), राहुल द्रविड (24208), ब्रायन लारा (22358), सनथ जयसूर्या (21032) आणि शिवनारायण चंद्रपॉल (20988) यांचा क्रमांक लागतो. अकराव्या स्थानावर इंझमाम उल हक (20580) आणि आता 12व्या स्थानावर जो रुट (20079) आहे. एबी डिव्हिलियर्स 13व्या स्थानावर घसरल्या गेला, ज्यानं 20014 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
एका सुवर्ण युगाचा अंत! महान टेनिसपटू राफेल नदालची निवृत्तीची घोषणा
घरच्या मैदानावर पाकिस्तानची नाचक्की! इतक्या वर्षांनंतर कसोटीत बनल्या 800 पेक्षा अधिक धावा
एक-दोन नव्हे तर इतक्या रेकॉर्ड्स, बांग्लादेशला हरवून भारताने केले मोठे विक्रम