Joe Root Century: जो रूटने भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करत शानदार शतक झळकावले आहे. दरम्यान त्याने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. रूट सध्या खूपच शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने सध्याच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत धावांचा पाऊस पाडला आहे. चौथ्या कसोटीत त्याने धावा करण्यात कोणतीही घाई दाखवली नाही. खराब चेंडूंना सीमेपलीकडे पोहोचवले, तर चांगल्या चेंडूंना पूर्ण मान दिला. (Joe Root century)
जो रूटचे इंग्लंडच्या भूमीवर कसोटीतील हे 23 वे शतक आहे. (England Test record) याचसोबत घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने महेला जयवर्धने, जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंग यांची बरोबरी केली आहे. जयवर्धनेने श्रीलंकेत, कॅलिसने दक्षिण आफ्रिकेत आणि पाँटिंगने ऑस्ट्रेलियात प्रत्येकी 23-23 कसोटी शतके झळकावली होती. तर सचिन तेंडुलकरने भारतात 22 कसोटी शतके झळकावली होती. आता घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत रूट दिग्गज फलंदाज तेंडुलकरपेक्षा पुढे गेला आहे. (Most Test centuries at home)
जो रूटने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावत 53 धावांची खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या कसोटीत तो विशेष कमाल दाखवू शकला नाही. मग तिसऱ्या कसोटीत त्याच्या फलंदाजीचा जलवा पुन्हा पाहायला मिळाला आणि त्याने उत्कृष्ट शतक झळकावत 104 धावांची खेळी केली होती. आता चौथ्या कसोटी सामन्यातही त्याने शतक झळकावले आहे. तो 119 धावांसह अजूनही क्रिजवर नाबाद आहे. (Joe Root vs India)
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघ 358 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर इंग्लंडची सुरुवात खूप चांगली झाली. सलामीवीरांनी 166 धावांची भागीदारी केली. जॅक क्रॉलीने 84 धावा, बेन डकेटने 94 धावा आणि ऑली पोपने 71 धावा केल्या. रूट 116 धावा आणि बेन स्टोक्स 32 धावा घेऊन क्रीजवर आहे. इंग्लंडने 424 धावा केल्या आहेत आणि त्यांच्याकडे 70 धावांची आघाडी आहे. (India vs England Fourth Test)






