---Advertisement---

जो रूटचे खास शतक! द्रविडचा रेकाॅर्ड मोडला, आता नंबर पाॅन्टिंगचा

On: शनिवार, डिसेंबर 7, 2024 1:42 PM
joe root
---Advertisement---

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने (Joe Root) न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात बाजी मारली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रूट 106 चेंडूत 73 धावा करून नाबाद राहिला. या खेळीसह रूटने भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडला (Rahul Dravid) मागे टाकले आहे. रूटने कसोटी क्रिकेटमध्ये विशेष शतक पूर्ण केले असून द्रविडच्या पुढे गेला आहे. इंग्लंडने दिवसाच्या खेळाअखेर 533 धावांची आघाडी घेतली आहे.

राहुल द्रविडने (Rahul Dravid) कसोटी क्रिकेटमध्ये 50+ 99 वेळा धावा केल्या आहेत, त्याला मागे सोडून, ​​रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 100व्यांदा 50+ धावा केल्या आहेत. द्रविडने कसोटीत 36 शतकांसह आणि 63 अर्धशतके केली होती. रूटने आतापर्यंत 35 शतकांसह 65 अर्धशतके झळकावली आहेत. तो इंग्लंडचा पहिला फलंदाज बनला. तर कसोटीत 100 वेळा 50+ धावा करणारा जगातील केवळ चौथा फलंदाज ठरला.

आता फक्त रिकी पाॅन्टिंग (Ricky Ponting), जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि महान सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) रूटच्या पुढे आहेत. पॉन्टिंग, कॅलिस यांनी 103 वेळा कसोटीत 50+ धावा केल्या आहेत. तर सचिनने सर्वाधिक 119 वेळा 50+ धावा केल्या आहेत. पॉन्टिंगने 41 तर कॅलिसने 45 कसोटीत शतके झळकावली आहेत.

जो रूट यंदाच्या वर्षात चमकदार कामगिरी करताना दिसला आहे. तो 2024 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज आहे. रूटने यावर्षी खेळल्या गेलेल्या 16 कसोटी सामन्यात 1,437 धावा केल्या आहेत. दरम्यान तो 4 वेळा नाबाद देखील राहिला आहे. तो अजूनही फलंदाजी करत आहे त्यामुळे या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे. रूटने यावर्षी सुमारे 58च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 शतकांसह 5 अर्धशतके देखील झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

जसप्रीत बुमराहचा शोध कसा लागला? दिग्गजाने सांगितली सर्व गोष्ट! म्हणाला…
IND vs AUS: आउट की नॉट आउट? थर्ड अंपायरच्या निर्णयावर मोठा गोंधळ; सोशल मीडियावर चाहत्यांचा आक्रोश
SFA चॅम्पियनशिप 2024 मुंबई; फुटबॉल फील्ड, टेनिस कोर्टवर सुवर्णपदकांची लढाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---