लिड्स | भारता विरुद्ध इंग्लंडला एकदिवसीय मालिका जिंकून देण्यात फलंदाज जो रुटने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक करत, इंग्लंडच्या मालिका विजयात रुटने मोलाची भूमिका बजावली आहे.
याचबरोबर इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक तेरा शतके करण्याचा मान जो रुटने पटकावला आहे.
भारता विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रुट नाबद १०० धावा करत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जो रुटने ११३ धावा केल्या होत्या.
यापूर्वी इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२ शतके करण्याचा मान माइकल ट्रैस्कोथिककडे होता.
जो रुटने इंग्लंडसाठी ११६ एकदिवसीय सामने खेळताना १३ शतके झळकावली आहेत.
लिड्स येथील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारतावर ८ गडी राखून सहज विजय मिळवला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला २५७ धावांचे आव्हान दिले होते. भारताचे हे आव्हान जो रुट नाबाद १०० आणि कर्णधार इयोन मार्गनच्या ८८ धावांच्या जोरावर इंग्लंडने सहज पार केले.
त्याचबरोबर इंग्लंडने भारता विरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय माालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज-
जो रुट- १३
माइकल ट्रैस्कोथिक- १२
इयोन मॉर्गन- १०
केव्हीन पिटरसन- ९
ग्राहम गूच- ८
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियाला पराभूत करत इंग्लंडने जिंकली वनडे मालिका; मॉर्गन-रुटची जोडी ठरली विजयाची शिल्पकार
-एशियन्स गेम्स २०१८: आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने केली १२ पुरुष आणि ९ महिला संघांची घोषणा