---Advertisement---

बाबो! रुटची बॅटपण राहते ‘स्वत:च्या पायावर उभी’, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जून 6, 2022 5:31 PM
Joe-Root-Magic
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद ११५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने न्यूझीलंडवर ५ गडी राखत मात केली. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ प्रथमच या मैदानावर कसोटी सामना खेळायला गेला होता आणि या सामन्यात इंग्लिश संघाने ५ विकेट राखून विजय मिळवला आणि यासह इंग्लंडने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्युझीलंड विरुद्धच्या या सामन्यात जो रूटला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. मात्र, यासर्वांपेक्षाही सध्या जो रुचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यान, एक क्षण असा आला जेव्हा जो रूटची एक अद्भुत जादू कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये जो रूट नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा असलेला दिसत आहे. तो स्वत: आणि त्याची बॅटही उभी आहे, पण रूटने बॅटला धरले नाही, म्हणजेच त्याची बॅट रुटच्या आधाराशिवाय उभी होती. यानंतर, जेव्हा गोलंदाज चेंडू फेकतो, तेव्हा तो त्याच्या हातांनी बॅट धरलेला दिसतो. अशाप्रकारे कोणत्याही आधाराशिवाय बॅट उभी राहणे हे खरोखरच आश्‍चर्यकारक असून ही जो रुटची जादू होती की आणखी काही असा प्रश्‍न सर्वांच्याच मनात उपस्थित होत आहे.

जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २६ वे शतक न्यूझीलंडविरुद्ध ठोकले आणि कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावाही पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारा तो इंग्लंडचा दुसरा फलंदाज तसेच असे करणारा जगातील १४वा फलंदाज ठरला. इशवाय सर्वात कमी कालावधीत कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा-

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: आयपीएलमध्ये ‘कल्ला’ करणाऱ्या ‘या’ तीन खेळाडूंवर राहिल नजर

जो रुट तोडणार सचिनचा ‘हा’ विक्रम, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी

कडकडून मिठी अन् कौतुक! लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या रुटचे कर्णधार स्टोक्सकडून ‘ग्रँड वेलकम’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---