इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023 मधील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे. चौथ्या दिवसाच्या लंचपूर्वी इंग्लंड संघाचा दिग्गज खेळाडू जो रूट याने शानदार क्षेत्ररक्षण करत आपला जलवा दाखवला आहे. रूटने एकाच हाताने झेल घेतली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड याच्या खेळीचा शेवट झाला. अशात रूटच्या झेलाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
रूटचा अफलातून झेल
झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसऱ्या डावातील 68वे षटक स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) टाकत होता. ब्रॉडने षटकातील तिसऱ्या चेंडूवर आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. हा चेंडू थेट ट्रेविस हेड (Travis Head) याच्या छातीवर आला. यावेळी हेडने चेंडूपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटची कड घेत वेगाने शॉर्ट लेगच्या दिशेने गेला. शॉर्ट लेगवर जो रूट (Joe Root) क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी रूटने कमाल दाखवली.
Stop that Joe Root! ????#EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/IYHnLq5q69
— England Cricket (@englandcricket) July 1, 2023
रूटने यावेळी डाव्या बाजूला झेप घेत एका हाताने शानदार झेल पकडला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हेडला दुसऱ्या डावात खास कामगिरी करता आली नाही. हेड 16 चेंडू खेळून फक्त 7 धावांवर बाद झाला. यावेळी त्याने 1 चौकारही मारला.
सामन्याविषयी थोडक्यात
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ (110), ट्रेविस हेड (77) आणि डेविड वॉर्नर (66) यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर 416 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाने बेन डकेट याच्या 98 धावा आणि हॅरी ब्रूक याच्या 50 धावांच्या जोरावर पहिल्या डावात फक्त 325 धावाच केल्या होत्या.
यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 91 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजा (77) याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 5 विकेट्सच्या नुकसानीवर 200 धावांचा आकडा पार केला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात 89 षटकांच्या खेळापर्यंत 7 बाद 242 धावा केल्या. यामुळे त्यांच्याकडे 333 धावांची आघाडी आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स नाबाद क्रीझवर आहेत. (cricketer joe root one handed catch at short leg of travis head in eng vs aus 2nd test ashes 2023)
महत्वाच्या बातम्या-
भुवनेश्वर कुमारने जिंकले 140 कोटी भारतीयांचे मन, मुलांच्या शिक्षणासाठी ‘एवढे’ लाख रुपये केले दान!
मोठी बातमी! आयर्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी