ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. पावसामुळे अनिर्णीत राहिलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांचा दबदबा होता. तर या सामन्यात कर्णधार रूटला वगळता इतर कुठल्याही इंग्लिश फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामूळे इंग्लंडच्या फलंदाजांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान जो रूटने या फलंदाजांचा बचाव करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जो रूटने एका ऑनलाईन चर्चा सत्रात म्हटले की, “तुम्ही पाहू शकता की,हे खेळाडू सतत सराव करत आहेत. तुम्ही या संघाच्या मेहनतीवर टीका करू शकत नाही. मला असे वाटते की,सर्वच खेळाडू सराव करत असताना आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या आणि स्वतःला आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. कोविड-१९ मुळे सातत्य टिकवून ठेवण्यात अडचणी येत आहेत. तसेच खेळाडूंचा भार कमी करण्यासाठी रोटेशन पॉलिसीचा अवलंब करण्यात आला होता. या पॉलिसीमुळे देखील खेळाडूंना सातत्य टिकवून ठेवण्यात अडचणी येत आहेत.”
बॉयकॉटने म्हटले होते की, “सतत वनडे क्रिकेट खेळत असलेले खेळाडू ऑफ स्टंपच्या बाहेर जात असलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असतात.” याबाबत बोलताना रूट म्हणाला की,”कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या विकेट वाचवण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. त्यासाठी चांगली टेकनिक असणे आवश्यक आहे. यासोबतच संधी मिळाल्यावर तुम्ही विरोधी संघावर आक्रमण करण्यासाठी देखील सक्षम असायला हवे.”(Joe root says no one can raise questions on hard work of England team players)
तसेच कर्णधार रूट पुढे म्हणाला की, “अशा परस्थितीत एकेरी दुहेरी धावा काढणे आणि स्ट्राइक रोटेट करणेही तितकेच महत्त्वाचे असते.” तसेच गेल्या काही महिन्यांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या मोइन अलीबद्दल बोलताना रूट म्हणाला की, “मी नेहमीच त्याचा एक मोठा चाहता राहिलो आहे. तो क्रिकेटच्या तीनही प्रकारात एक अप्रतिम क्रिकेटपटू आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी,जो दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
चिन्ना थाला इज बॅक! धोनी पाठोपाठ रैनाही चेन्नईत दाखल, जाणून घ्या केव्हा होणार युएईला रवाना
“… तर भारतीयांनी मला मारले असते” शोएब अख्तरचा खळबळजनक खुलासा