---Advertisement---

IND vs ENG: जो रूटचे भारताविरुद्ध 11 वे शतक, तरीही ‘या’ रेकार्डमध्ये सचिन तेंडुलकर आजही किंग!

On: शुक्रवार, जुलै 11, 2025 5:08 PM
---Advertisement---

Joe Root Century: सध्या भारत विरूद्ध इंग्लंड संघातील तिसरा कसोटी सामना ऐतिहासिक लाॅर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने भारताविद्धच्या शानदार शतक झळकावले आहे. भारताविद्धचे हे त्याचे 11 वे शतक आहे. (Root’s 11th century vs India) रूटला भारताविरुद्ध फलंदाजी करायला खूप आवडते, हे यावरूनच स्पष्ट होते की तो भारताविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. रूटने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथची बरोबरी केली आहे. स्मिथनेही भारताविरुद्ध 11 शतके झळकावली आहेत. भारताच्या कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. सचिननेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 शतके झळकावली आहेत. (Sachin Tendulkar Test record)

जो रूटने इंग्लंडसाठी ही उत्कृष्ट खेळी अशा वेळी केली, जेव्हा इंग्लंड संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले. रूटने 199 चेंडूंमध्ये 104 धावांची शानदार खेळी केली. (Joe Root century) दरम्यान त्याने 10 चौकार मारले. रूटने शतक पूर्ण करताच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला क्लीन बोल्ड केले. बुमराहने रूटची विकेट घेण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला बाद केले, त्यानंतर रूटची विकेट घेतली आणि ख्रिस वोक्सलाही तंबूचा रस्ता दाखवला. बुमराहने या कसोटीत आतापर्यंत 4 विकेट्स घेतल्या आहेत. (Jasprit Bumrah wickets)

जो रूट कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे आणि त्याने सचिन तेंडुलकरच्या रेकाॅर्डची बरोबरी केली आहे. पण रूट अजूनही कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनलेला नाही. या रेकाॅर्डमध्ये सचिनच्या बरोबरीला पोहोचणे कोणत्याही खेळाडूसाठी खूप कठीण आहे. जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील हे 37 वे शतक झळकावले आहे. तर केवळ भारतातच नाही, तर जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके झळकावली आहेत. (Sachin Tendulkar centuries)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---