कौंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायर विरुद्ध लँकेशायर संघात पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटने गोलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली आहे.
मात्र यामुळे 1 आॅगस्टपासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघासाठी त्याची फलंदाजीबरोबरच आता गोलंदाजीचीही चिंता वाढली आहे.
रुटने या सामन्यात लँकेशायरविरुद्ध दुसऱ्या डावात 7.4 षटके गोलंदाजी करताना फक्त पाच धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्याने केलेल्या या कामगिरीमुळे यॉर्कशायरने या सामन्यात 118 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात लँकेशायर विजयासाठी दुसऱ्या डावात 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होते. मात्र जो रुटने गोलंदाजी कारकिर्दीत सर्वोत्तम कामगिरी करत लँकेशायरला 204 धावातच रोखण्यात यश मिळवले.
Joe Root v Jos Buttler: there can be only one winner
Reckon this will get mentioned in the @englandcricket changing room? 😬 pic.twitter.com/vvZzJxYz7h
— Vitality County Championship (@CountyChamp) July 24, 2018
रुट बरोबरच या सामन्यात यॉर्कशायरचा कर्णधार स्टीव्हन पॅटरसननेही दुसऱ्या डावात 3 विकेट घेत मोलाची कामगिरी बजावली. लँकेशायरकडून दुसऱ्या डावात फक्त जॉस बटलरने अर्धशतकी खेळी केली.
या सामन्याला महत्त्व आले होते कारण या सामन्यात जो रुट, केन विलियमसन, जॉस बटलर, जेम्स अँडरसन असे मोठे खेळाडू खेळत होते. तसेच भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेआधी चांगल्या सरावाची संधी होती.
पंरतू गोलंदाजीत चमकलेल्या रुटला या सामन्यात रुटला दोन्ही डावात मिळून फक्त 25 धावा करण्यात यश मिळाले आहे.
रुटने भारताविरुद्ध वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी करताना दोन शतके केली होती.
यॉर्कशायर विरुद्ध लँकेशायर, संक्षिप्त धावफलक:
यॉर्कशायर- पहिला डाव: सर्वबाद 192 धावा
लँकेशायर- पहिला डाव: सर्वबाद 109 धावा
यॉर्कशायर- दुसरा डाव: सर्वबाद 239 धावा
लँकेशायर- दुसरा डाव: सर्वबाद 204 धावा
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला
–रोहीत शर्माच्या पत्नीचे युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर