Joe Root Records: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने मँचेस्टरच्या मैदानावर रेकाॅर्डची झडी लावली आहे. रूटने आज एकाच शतकासह अनेक मोठे रेकाॅर्ड मोडले आहेत. रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला देखील मागे टाकले आहे. चला तर मग जो रूटच्या त्या 5 रेकाॅर्डबद्दल जाणून घेऊयात, ज्यामुळे क्रिकेटचे मोठे रेकाॅर्ड मोडले गेले आणि नवीन विश्वविक्रम झाले. (Joe Root records Manchester)
1) भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात जो रूट टी-ब्रेकपर्यंत 121 धावांवर पोहोचला आहे. यासह त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये 13,380 धावा झाल्या आहेत. रूटने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. पाँटिंगच्या कसोटीत 13,378 धावा आहेत. रूट या सामन्यात 31 धावा करताच भारताचा महान खेळाडू राहुल द्रविड आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिस यांच्या पुढे गेला होता. या यादीत अव्वल स्थानी महान खेळाडू सचिन तेंडुलकरचे नाव आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. (most runs Test cricket)
With many stalwarts now behind him, only Sachin Tendulkar remains in Joe Root’s path 👏
— ICC (@ICC) July 25, 2025
#WTC27 | #ENGvIND | ➡️ https://t.co/ZxLl2veHTh pic.twitter.com/FndKFXXdEv
2) जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील हे 38 वे शतक झळकावले आहे. या शतकासह त्याने कसोटीत श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगाकाराची बरोबरी केली आहे. रूटने ही 38 शतके 157 सामन्यांच्या 286 डावांमध्ये केली आहेत. तर संगाकाराने 134 सामन्यांच्या 233 डावांमध्ये 38 शतके झळकावली आहेत. या यादीतही अव्वल स्थानी भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरचे नाव आहे. सचिनच्या नावावर कसोटीत 51 शतके आहेत. (Joe Root vs Sachin Tendulkar)
3) जो रूटच्या कसोटीतील 38 शतकांपैकी 12 शतके भारताच्या विरोधात आहेत. मँचेस्टरमधील शतकासह तो भारताविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे. तर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध 11 शतके झळकावली आहेत. (Joe Root most centuries vs India)
4) जो रूटने कसोटीत 50 पेक्षा जास्त धावा 104 वेळा केल्या आहेत. (Joe Root 50+ scores) तर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस या दोघांनीही 103 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. या यादीतही भारताचा सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने कसोटीत 119 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
5) भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळली जात आहे. रूट या मैदानावर 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. (Joe Root Old Trafford runs)






