इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट सध्या संघासोबत न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या तयारीत आहे. जो रूट म्हणाला की, आगामी कसोटी मालिकेत भारत आणि न्यूझीलंड या कट्टर प्रतिस्पर्धी संघाला हरवणे, हे त्यांच्यासाठी या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेच्या या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 1877 ला मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यानंतर अॅशेस संबोधले जाऊ लागले. अॅशेस कसोटी मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. यंदाच्या वर्षीच्या अॅशेस मालिकेच्या अगोदर इंग्लंडला न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध मिळून एकूण सात कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर इंग्लंड संघ नोव्हेंबर महिन्यात अॅशेस मालिका खेळायला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्याअगोदर इंग्लंडला जून महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने आणि ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये भारताविरुद्ध पाच कसोटी सामने खेळावे लागणार आहेत.
इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामना अगोदरच म्हणाला होता की, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिकेची चर्चा आतापासूनच सुरू आहे. आम्ही खूप दिवसापासून या मालिकेची तयारी करत आहोत. इंग्लंडच्या खेळाडूंसाठी अॅशेस मालिका खूप महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे.”
रूट पुढे म्हणाला की, “निश्चितच अॅशेस मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणूनच यांची सर्वश्रेष्ठ तयारी केली आहे. आणि या सात कसोटी सामन्यांमधील तयारीच्या जोरावर उत्कृष्ट प्रदर्शन करून संघाचा विजय निश्चित करू. आणि आमच्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाला हरवण्याचा प्रयत्न करू.”
अॅशेस मालिका ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी मालिका आहे. ही मालिका पाच सामन्यांची कसोटी असते. ही मालिका दर दोन वर्षांनी खेळली जाते. या वर्षी ही मालिका नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होईल. मागील मालिका अनिर्णीत राहिल्याने अॅशेस कप ऑस्ट्रेलियाकडे कायम आहे.
महत्वाच्या बातम्या:
वडिलांच्या जन्मदिनी एबी बनला गायक, मॅक्सवेलने खेचली टांग
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील या गोष्टीवर रवी शास्त्री नाराज, आयसीसीला सुचवला बदल
मला बोर्डाचे चेअरमनपद दिले तर मी वेगवान गोलंदाजांची कमतरता जाणवू देणार नाही