---Advertisement---

‘जो’ चे शतक अन् साथीदार शून्य धावांवर नाबाद! पाहा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अनोखी खेळी

Joe-Smashes-Century
---Advertisement---

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असलल्याचे म्हंटले जाते. या खेळात कधीही काहीही होऊ शकते. याचीच अनुभुती नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेलल्या सामन्यात पाहायला मिळाली. हा सामना 27 जुलै रोजी क्रिकेट क्लब हॉर्शम आणि हॉर्ले सरे यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हॉर्शमचा सलामीवीर जो विलिसने ४४ चेंडूत ११ चौकार आणि ९ षटकारांसह १०३ धावा केल्या. जो विलिसने षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. मात्र, खरी मजा तर यापुढे पाहायला मिळाली.

आता तुम्ही विचार करत असाल की यात नवीन काय आहे की एका सलामीवीराने षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले. वास्तविक, खरा सामना झाला, विलिस दुसरा सलामीवीर आल्फ्रेड हेन्ससह सलामीला आला. हेन्सला आपले खातेही उघडता आले नाही आणि दुसऱ्या टोकाला विलिसने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. अर्थात एकीकडे सलामीवीर जो विलिस गोलंदाजांची धुलाई करण्यात व्यस्त होता. अन् दुसरीकडे मात्र, त्याचा साथीदार आल्फ्रेड हेन्स त्याचे धावांचा खातेही उघडू शकला नाही. या अनोख्या खेळीचा अन् क्रिकेटच्या स्कोरकार्डचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

यादरम्यान अल्फ्रेड हेन्स दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या विलिसच्या फलंदाजीचा आनंद घेताना दिसला. दोघांमध्ये ११० धावांची भागीदारी झाली, ज्यामध्ये १०३ धावा एकट्या विलिसच्या बॅटमधून आल्या. मात्र, विलिसच्या शतकानंतर आल्फ्रेड हेन्सने आपले खाते उघडले आणि २४ चेंडूत ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, ज्यात चौकाराचा समावेश होता. विलिसच्या खेळीमुळे या सामन्याचा निकाल हॉर्ले सरेच्या बाजूने लागला आणि संघाने ७ विकेट्सने सामना जिंकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या –

कॉमनवेल्थमध्ये भारताला आणखी एक ‘सुवर्ण’संधी! इतिहास रचत ‘हा’ खेळाडू मिळवणार गोल्ड मेडल

‘हरमनप्रीत कौर’च भारताची सर्वोत्तम कर्णधार, पाकिस्तानवरील विजयानंतर धोनीला मागे टाकत रचला विक्रम

आता होणार बॅझबॉल क्रिकेटचा धमाका! मॅक्यूलम बंधू घडवणार जगभरात तुफानी क्रिकेटर्स

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---