सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही वेगवान गोलंदाजांनी आपली छाप पाडली आहे. यात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचेही नाव आहे. आर्चरने आत्तापर्यंत आपल्याने वेगवान गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनला रस्ता दाखवला आहे. पण आर्चर केवळ त्याच्या गोलंदाजीमुळेच नाही तर त्याच्या काही ट्विट्समुळेही तो चर्चेत असतो. अनेकदा जगभरात होत असलेल्या वेगवेगळ्या घटनांनंतर आर्चरचे जुने ट्विट व्हायरल होत असतात. असेच आता पुन्हा एकदा त्याचे एक ट्विट व्हायर झाले आहे.
म्हणून आर्चरचे जुने ट्विट व्हायरल
खरंतर एप्रिल महिन्यात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली होती. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने हा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआयसमोर या हंगामातील उर्वरित ३१ सामने कधी आणि कुठे खेळवायचे असा प्रश्न होता.
अखेर २९ मे रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीनंतर बीसीसीआयने स्पष्ट केले की आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडेल.
ही घोषणा बीसीसीआयने केल्यानंतर लगेचच आर्चरने ६ वर्षांपूर्वी केलेले ट्विट व्हायरल व्हायला सुरुवात झाली. या ट्विटमध्ये आर्चरने लिहिले आहे की ‘आता दुबईला जावे लागेल’. आर्चरने हे ट्विट २६ एप्रिल २०१५ रोजी केले होते. आर्चरचे हे ट्विट राजस्थानने २९ मे २०२१ रोजी रिट्विट करत लिहिले की ‘जोफ, तुला हे माहित होते.’
You know it, Jof. ✈️ https://t.co/KYAPJmbR9e
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2021
यापूर्वीही अनेकदा आर्चरचे ट्विट व्हायरल
आर्चरचे जुने ट्विट व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या २ वर्षापासून अनेकदा त्याचे जुने ट्विट व्हायरल होत आले आहेत. त्याचमुळे अनेकदा क्रिकेट चाहते त्याला गमतीने भविष्यकार देखील म्हणतात. तर अनेकदा त्याला ‘आर्चर बाबा’, म्हणून संबोधले जाते.
आर्चरने आयपीएल २०२१ मधून घेतली होती माघार
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या आर्चरने दुखापतीमुळे आयपीएल २०२१ मधून माघार घेतली होती. मात्र आता पुन्हा आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु होण्यात साधारण साडेतीन महिन्यांचा कालावधी असल्याने आर्चर तंदुरुस्त होऊन आयपीएलमध्ये परतू शकतो. मात्र, त्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने परवानगी द्यावी लागणार आहे.
काही महिन्यांपूर्वी घराची साफसफाई करताना आर्चरच्या हातात काचेचा तुकडा घुसला होता. तसेच त्याची हाताच्या कोपऱ्याची दुखापतही वाढली होती. त्यामुळे तो सध्या तरी या दुखापतीतून सावरत असून त्याला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेलाही मुकावे लागणार आहे.
जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये ३५ सामने आत्तापर्यंत खेळले आहेत. यामध्ये त्याने २१.३२ च्या सरासरीने ४६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सात वर्षांपूर्वी रैनाने एकाच षटकात ७ वेळा चेंडूला केले होते सीमापार, वाचा त्या सामन्याबद्दल सविस्तर
‘या’ कारणामुळे जडेजा अन्य खेळाडूंपेक्षा क्षेत्ररक्षणात आहे सरस, स्वत:च केलाय खुलासा