मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2023 साठी कसून सराव करत आहे. मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आगामी हंगामात खेळणार नाहीये. पण बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर मुंबईसाठी जबरदस्त प्रदर्शन करेल, असेच दिसते. सराव सत्रात आर्चरने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला देखील आव्हान दिले. रोहित आणि ईशान किशन आर्चरच्या चेंडू खेळताना अडचणीत आसल्याचे पाहायला मिळाले.
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम 31 मार्च रोजी सुरू झाला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला आपला पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळायचा आहे. उभय संघांतील हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्व मुंबईच्या कॅम्पमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या जोरदार व्हायरल देखील होत आहे. मुंबईचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या व्हिडिओत आर्चरचा सामना करताना दिसत आहे. व्हिडिओत जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रोहित आणि ईशानपुढे आव्हान उभे करत असल्याचे स्पष्टपणे दिसते.
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत रोहित आणि ईशान दोघांनाही आर्चरच्या चेंडूचा अंदाज घेता येत नाही, असेच दिसते. व्हिडिओत एकदाही रोहित आणि ईशानपैकी कोणी मोठा शॉट खेळला नाहीये.
"Post bowling video Admin" – Presenting Jofra चा पहिला over in MI colors ????????#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @JofraArcher MI TV pic.twitter.com/h2Y1KvEV1O
— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2023
मागच्या वर्षी मुंबईने आर्चरला खरेदी करण्यास 8 कोटी रुपये मोजले होते. पण आर्चर दुखापतीच्या कारणास्तव मागच्या आयपीएल हंगामात एकही सामना खेळू शकला नाही. पण यावर्षी तो आपल्या भेदक गोलंदाजीने विरोधी संघांचा घाम काठण्यासाठी तयार दिसत आहे. असे असले तरी, यादरम्यान संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमी नक्कीच मुंबई इंडियन्सला जाणवू शकते.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ: रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमरून ग्रीन , पीयूष चावला, डुआन जानसेन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंदुलकर, अरशद खान.
(Jofra Archer bowled amazingly in the practice session of Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विल यंगच्या वादळापुढे श्रीलंकन गोलंदाजांनी टाकल्या नांग्या, न्यूझीलंडने वनडे मालिका 2-0ने घातली खिशात
GTvsCSK । गुजरात-चेन्नईचे महत्वाचे खेळाडू अनुपस्थितीत, ‘अशी’ आहे संभावित प्लेइंग इलेव्हन






