इंडयिन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील २०वा सामना मंगळवारी (६ ऑक्टोबर) झाला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडयिन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९३ धावा केल्या. दरम्यान सर्वांना दंग करणारी गोष्ट घडली.
झाले असे की, नाणेफक जिंकून मुंबई संघाने प्रथम फलंदाजी निवडली. त्यामुळे क्विटंन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर आले. पण १० षटकांच्या आत संघाचा स्कोर ८८ धावांवर आणत ते दोघेही पव्हेलियनला परतले. पुढे इशान किशन आणि क्रुणाल पंड्यानेही लवकरच त्यांच्या विकेट गमावल्या. मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अंतिम षटकात फलंदाजी करत होते.
तेवढ्यात डावातील १९वे षटक टाकण्यासाठी राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आला. त्याने षटकातील चौथा चेंडू इतक्या वेगाने बाउंसर टाकला की, तो थेट स्ट्राईकवर असलेल्या सूर्यकुमारच्या हेल्मेटला जाऊन लागला. पण सुदैवाने तो नकल बॉल होता, त्यामुळे त्याला दुखापत झाली नाही. पुढे फिजिओने मैदानावर येऊन त्याचा तपास केला. सूर्यकुमार चांगल्या स्थितीत असल्यामुळे तो पुढे खेळला. परंतु, त्याची दुखापत जास्त गंभीर आहे का नाही?, हे अद्याप सांगता येत नाही.
डावाअखेर सूर्यकुमारने नाबाद राहत ४७ चेंडूत ७९ धावा केल्या. यात त्याच्या ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
Jofra Archer coming for Hardik Pandya's headtop!🤯 #IPL2020 #RRvMI pic.twitter.com/888lSLa05K
— Rav (@rav23ldn) October 6, 2020
https://twitter.com/JagDillinger/status/1313505000610566144?s=20
Jofra and hitting on helmet goes hand in hand.#MIvsRR
— Defacto (@defactojourn) October 6, 2020
Archer makes connection with the helmet of Yadav.
Archer sure loves helmets!
LIVE #MIvRR COMMS:
👉https://t.co/NK5nvEt3Dd 👈#IPL2020 #Dream11IPL pic.twitter.com/XOqglPFm8t
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) October 6, 2020
https://twitter.com/tejas_pujare/status/1313505165052444672?s=20
सूर्यकुमारसोबत झालेल्या धक्कादायक घटनेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या-
इकडे आयपीएल सुरु असताना जगाला हेवा वाटावा असा विक्रम झाला महिला क्रिकेटमध्ये
कभी खुशी कभी गम! ‘या’ गोलंदाजाला पडलेत सर्वाधिक षटकार अन् त्यानेच टाकलेत सर्वाधिक डॉट
अखेर धोनीला पर्याय सापडला, दिग्गजाने जाहीर केले नाव
ट्रेंडिंग लेख-
असे ५ खेळाडू ज्यांनी आयपीएलमध्ये सलामीला आणि ८ व्या क्रमांकावर केली आहे फलंदाजी
दुर्दैवी…! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद झालेले ३ फलंदाज; विराटचाही आहे समावेश