मागील वर्षीच्या विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना नको नको करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरमुळे सर्व फलंदाजांना घाम फुटतो. त्याला पाहून असे वाटते की, त्याला जगातील कोणत्याच फलंदाजाची भीती वाटत नसेल. परंतु असे काही नाही. स्वत: आर्चरने जगातील त्या फलंदाजाचे नाव सांगितले आहे, जो टी२० क्रिकेट प्रकारात त्याच्यासाठी सर्वात खतरनाक आहे.
राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून इश सोधीने (Ish Sodhi) आर्चरबरोबर एक लाईव्ह सेशन केले होते. यादरम्यान आर्चरने (Jofra Archer) टी२० क्रिकेटमधील सर्वात कठीण फलंदाजाचे नाव सांगितले आहे.
आर्चर यादरम्यान म्हणाला की, “आयपीएलमध्ये अनेक वेळा माझा सामना केएल राहुलशी (KL Rahul) झाला आहे. त्यामुळे मी टी२० क्रिकेटमध्ये सर्वात खतरनाक फलंदाज म्हणून त्याचीच निवड करेल. तो राहुल सोडून इतर फलंदाजाला निवडू शकत नाही. कारण राहुलने नेहमी माझ्या गोलंदाजीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”
आयपीएलच्या १३ व्या मोसमात राहुल किंग्ज इलेव्हन पंजाबचे (Kings XI Punjab) नेतृत्व करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. राहुलला आर अश्विनच्या जागी संघाचे कर्णधारपद सोपविले आहे. खरंतर अश्विनला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात सामील केल्यामुळे पंजाबने राहुलकडे नेतृत्व सोपविले आहे. आयपीएलच्या मागील मोसमात राहुलने ५९३ धावा केल्या होत्या.
आर्चरने मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने जखमी केले होते. तो जगातील सर्वात खतरनाक गोलंदाज म्हणून ओळखला जातो.
राहुल मागील काही महिन्यांपासून केवळ फलंदाजीतच नव्हे तर यष्टीमागेही कमालीची कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेत त्याने रिषभ पंतच्या जखमी झाल्यानंतर यष्टीरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. जिथे त्याने स्वत:ला सिद्ध केले आणि न्यूझीलंड दौऱ्यावर त्याची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-शोएब अख्तर मारणार होता हरभजन सिंगला, भज्जीच्या हाॅटेल रुममध्ये..
-भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कोचने केली होती स्कर्ट घालून फलंदाजी
-८९ चेंडूत खणखणीत द्विशतक करणाऱ्या क्रिकेटपटूवर ६ वर्षांची बंदी