आयपीएल 2023 मधून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना निराश करणारी बातमी समोर येत आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला असून, त्याच्या जागी इंग्लंडचाच अनुभवी वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन याची वर्णी लागली. मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत घोषणा केली.
https://twitter.com/mipaltan/status/1655816035721781250?t=fPUNRjqHuntSIGajj1Nsrg&s=19
आर्चर याला मागील वर्षी मुंबई इंडियन्सने 8 कोटींची मोठी रक्कम देत आपल्या ताब्यात सामील करून घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नव्हता. यावेळी देखील पहिल्या सामन्यानंतर तो संघातून बरेच दिवस बाहेर राहिला. मधल्या काळात बेल्जियमला जाऊन त्याने आपल्या हातावर उपचार देखील घेतले. मात्र, आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने विनंती केल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आता त्याच्या या दुखापतीवर लक्ष ठेवेल. तसेच, त्याला योग्य आराम प्रक्रिया देखील उपलब्ध करून देईल. यावर्षी इंग्लंडला प्रतिष्ठेची ऍशेस मालिका तसेच भारतात वनडे विश्वचषक खेळायचा असल्याने आर्चर उपलब्ध असणे गरजेचे असेल.
त्याच्या या हंगामातील कामगिरीचा विचार केल्यास तो फारसा प्रभावी ठरू शकला नाही. त्याने पाच सामने खेळताना केवळ दोन बळी मिळवले होते.
त्याचा बदली खेळाडू म्हणून आलेल्या ख्रिस जॉर्डन याच्याकडे टी20 खेळण्याचा मोठा अनुभव आहे. मुंबई इंडियन्सला त्याची डेथ ओव्हर्समध्ये मदत होऊ शकते. आर्चर बेल्जियमला गेल्यानंतरच जॉर्डन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झालेला.
(Jofra Archer Ruled Out From IPL 2023 Chris Jordan Joins Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केकेआरच्या विजयाने गुणतालिकेत खळबळ! मुंबईसह ‘हे’ संघ डू ऑर डाय स्थितीत, वाचा सविस्तर
“ईडन गार्डन्सवर रिंकू-रिंकू ऐकून अंगावर काटा येतो”, राणा-रसेलची दिलखुलास कबुली






