इंग्लंड संघाचा वेगवान गोलंंदाज जोफ्रा आर्चर आपल्या राष्ट्रीय संघात पुनरागमनासाठी कठोर परिश्रम घेत आहे. यादरम्यान तो सराव करतानाही दिसला. तो बऱ्याच काळापासून संघाच्या दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. मात्र, बऱ्याच काळानंतर सराव केल्यानंतर तो म्हणाला की मैदानावर येऊन चांगले वाटत आहे. अशातच सरावादरम्यान त्याच्यासोबत एक घटना घडली. त्याने ट्वीट करत त्याचा चेंडू चोरी गेल्याची माहिती सर्वांना दिली.
इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीनंतर सरावासाठी मैदानात परतला आहे. मात्र, मैदानात परतल्यावर त्याच्याबोबत एक विचित्र घटना घडली. तो ज्या चेंडूने सराव करत होता. तो एका महिलेने चोरी केला. यावर आर्चर ट्वीट करत म्हणाला की,”काल माझ्या सरावादरम्यान माझा चेंडू चोरी करणाऱ्या महिलेला माझा आशिर्वाद. त्या चोरी केलेल्या चेंडूने तुम्हाला एक फ्लॅट मिळून जाईल.” जोफ्रा आर्चर इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज आहेे. चाहत्यांसोबत फोटो आणि आणि ऑटोग्राफ देण्यासाठी नेहमी तयार असतो. अशातच त्याचा चेंडू एका महिलेेने चोरी केेल्याने तो संतप्त झाला आणि त्याने ट्वीटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत म्हणाला की या चेंडूमुळे तुला फ्लॅट मिळून जाईल याची अपेक्षा आहे.
जोफ्रा आर्चर याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध 20 मार्च 2021मध्ये खेळला होता. त्यानंतर जुलै 2021मध्ये त्याने ससेक्स संघासाठी केंट संघाविरुद्ध सामना खेळत पुनरागन केले होते. मात्र, पुन्हा एकदा त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले. आर्चरला आधी कोपऱ्याच्या दुखापतीतून सावरण्यात वेळ लागला. मात्र, परत एकदा त्याला पाठीत फ्रॅक्चरची समस्य़ा उद्भवली आणि पुन्हा एकदा बऱ्याच महिन्यांसाठी संघाबाहेर जावे लागले. इंग्लंडच्या या गोलंदाजाला मुंबई इंडियन्स संघाने खरेदी केले होते. मात्र, तो स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला धक्का! राहुलला प्रॅक्टिसवेळी मोठी दुखापत, संघाबाहेर पडताच ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ खेळाडू श्रीलंकेविरुद्ध करू शकतो संघपुनरागमन