---Advertisement---

आयपीएल 2024 मधून जोफ्रा आर्चरची माघार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय

On: सोमवार, डिसेंबर 4, 2023 4:45 PM
Jofra-Archer
---Advertisement---

इंग्लंड संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलच्या आगामी हंगामात खेळताना दिसणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरला आगामी आयपीएल हंगामात खेळण्यास नकार दिला आणि या कारणास्तव जोफ्रा आर्चरने आयपीएलच्या आगामी हंगामाच्या लिलावासाठी आपले नाव नोंदवले नाही.

वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची इच्छा आहे की जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकावर लक्ष केंद्रित करावे आणि म्हणून त्याला आयपीएलमधून माघार घेण्यास सांगितले आणि आर्चरने तेच केले. जोफ्रा आर्चरला पुन्हा एकदा दुखापत होऊन त्याने वर्ल्डकपमधून बाहेर पडावे असे इंग्लंड बोर्डाला वाटत नाही.

जोफ्रा आर्चरने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडसाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन केले परंतु त्याची कामगिरी तितकी चांगली नव्हती आणि तो अजिबात लयीत दिसत नव्हता. यानंतर त्याने मुंबई इंडियन्ससाठी काही आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला पण दुखापतीमुळे तो पुन्हा बाहेर पडला. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे पूर्ण वर्ष संघातून बाहेर राहिला. तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही पण इंग्लंड संघात सामील होऊन सराव करत आहे.

जोफ्रा आर्चरने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघासोबत राखीव खेळाडू म्हणून दौराही केला होता, परंतु आठवडाभरातच त्याला दुखापतीमुळे मायदेशी परतावे लागले. आर्चरने नुकताच इंग्लंड बोर्डासोबत दोन वर्षांचा करार केला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, याच कारणामुळे ईसीबीने त्याला आयपीएलमधून नाव मागे घेण्यास सांगितले. यामुळे आर्चरच्या दुखापतीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे. (Jofra Archer’s withdrawal from IPL 2024 England Cricket Board took a shocking decision)

महत्वाच्या बातम्या

‘मला गोलंदाजी करायची आहे, पण…’, श्रेयस अय्यरचा गोलंदाजी करण्याबाबत धक्कादायक खुलासा
ब्रेकिंग! INDvsSA तिन्ही मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने घोषित केला संघ, ‘या’ पठ्ठ्याकडं टीमची धुरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---