कॅप्टन कूल एमएस धोनी आणि बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची मैत्री सर्वांना माहितच आहे. ते बऱ्याचदा एकत्रही दिसतात. असाच त्या दोघांचा एक मजेदार किस्सा जॉनने त्याच्या परमाणू चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सांगितला होता.
त्याने सांगितले होते की “आम्ही एकदा माझ्या ऑफिसमध्ये बाईक बाहेर काढण्यासाठी गेलो होतो. पण आम्हाला दिसले की वॉचमॅन झोपला होता आणि मुख्य गेटला कुलुप लावलेले होते. त्यामुळे आम्ही भिंतीवरुन उडी मारुन आत गेलो.”
“पण जेव्हा बाहेर यायचे होते तेव्हा आम्हाला गेटवरुन यावे लागणार होते. मला माहित नाही धोनीने ते कसे केले पण तो काही उड्यांमध्येच सहज बाहेर गेला. मग मी विचार केला जर धोनी करु शकतो तर मीही करु शकेल. त्यामुळे मी पळालो आणि त्याने जसे केले तसेच केले. पण माझी पँट गेटमध्ये आडकली आणि फाटली. धोनी खरचं ऍथलिट आहे.”
धोनी नेहमीच त्याच्या फिटनेसवर लक्ष देत असतो. हाच किस्सा याआधीही धोनीने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात सांगितला होता.
जॉनने पुढे सांगितले, “जेव्हापण मला वेळ असतो तेव्हा मी क्रिकेट पाहत असतो. त्याशिवाय धोनी जवळचा मित्र असल्याने मला वाटले तरी मी क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही.”