क्रिकेट रायटर्स क्लब ऑफ इंग्लंडने नुकतीच आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. सध्या दुखापतीमुळे इंग्लंड क्रिकेट संघाबाहेर असलेला अनुभवी फलंदाज जॉनी बेअरस्टो याने या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटूचा पुरस्कार आपल्या नावे केला. त्याला प्रतिष्ठेची बॉब विलीस ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येईल. त्यासोबतच इतरही काही पुरस्कारांची घोषणा केली गेली आहे.
इंग्लिश क्रिकेट रायटर्स यांच्या मतदानानंतर दिल्या जाणारा हा पुरस्कार यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केलेल्या बेअरस्टोला प्रदान केला गेला. टी20 क्रिकेटचा आदर्श फलंदाज मानला जाणारा बेअरस्टो यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने 6 सामन्यात 75.66 च्या सरासरीने 681 धावा केलेल्या. यादरम्यान त्याने चार शतके आणि एक अर्धशतक झळकावलेले. त्याने न्यूझीलंडविरुद्ध चार आणि भारताविरुद्ध एक शतके झळकावली होती. त्याच्या धडाकेबाज शतकांमुळे इंग्लंडने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला होता. तसेच भारताविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवलेली. मागील महिन्यात गोल्फ खेळत असताना पडल्यानंतर त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो आता जवळपास सहा महिने क्रिकेट पासून दूर राहणार आहे.
इतर पुरस्कारांमध्ये केंट आणि ओव्हल इनविंसिबल्सचा युवा खेळाडू जॉर्डन कॉक्स याला वर्षातील सर्वोत्तम युवा क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून इंग्लंड संघाची कर्णधार नताली सिवर हिची निवड केली गेली. युवा महिला खेळाडू फ्रेया केम्पला वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख महिला खेळाडू म्हणून गौरविले गेले. जोश प्राईम याला सर्वोत्तम दिव्यांग क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ वॉशिंग्टन सुंदरच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर घडलीये अफलातून घटना; वाचा आजवरचा प्रवास
वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी