२०१७मध्ये ऍडलेड ओव्हल स्टेडिअमवर झालेल्या ऍशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्या दरम्यान इंग्लंड यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोला एका चाहत्यांकडून त्याच्या वडिलांची एक खास भेट मिळाली होती. या भेटीमुळे बेअरस्टो चांगलाच भावुक झाला होता.
एंड्रयू जॉन्स या चाहत्याने बेअरस्टोला त्याच्या दिवंगत पिता डेव्हिड बेअरस्टो यांचे ३९ वर्षे जुने ग्लोव्ज भेट म्हणून दिले होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी जोन्सने बेअरस्टोला ग्लोव्ज मिळाले होते.
जॉनी बेअरस्टोचे वडील डेव्हिड बेस्ट्रो हे इंग्लंडचे माजी कसोटी यष्टीरक्षक होते, त्यांनी जॉनी ८ वर्षांचा असतानाच आत्महत्या केली होती. ते इंग्लंड संघाकडून ४ कसोटी सामने आणि २१ वनडे सामने खेळले होते. पुढे त्यांचाच मुलगा जॉनी देखील यष्टीरक्षकच झाला.
काय आहे पुर्ण स्टोरी
या ग्लोव्जबद्दल चाहता जोन्सने एबीसी रेडियोशी बोलताना सांगितले होते की ” मी या ग्लोव्जला ३९ वर्षे सांभाळून ठेवले होते. मला एकदा माझे आई- वडिल ऍडलेडमधील एका शॉपिंग सेंटरमध्ये घेऊन गेले होते. तेव्हा तिथे इंग्लंडचा संघही भेट देण्यासाठी आला होता.”
“तिथे त्यांनी छोटी प्रश्नमंजुषा खेळली. त्यावेळी त्यांनी एक प्रश्न विचारला की इंग्लंडचे रिझर्व्ह यष्टिरक्षक कोण होते. त्यावेळी मी हात वर करून डेव्हिड बेअरस्टो असे उत्तर दिले होते. तेव्हा त्यांनी स्वाक्षरी करून या ग्लोव्जची जोडी भेट दिली.”
“मी त्या ग्लोव्जच्या जोडीला ३९ वर्षे एका बॉक्समध्ये सांभाळून ठेवले होते.”
Andrew Johns joins us now, he presented Jonny Bairstow with a signed wicketkeeping gloves by his dad David Bairstow from 1978/79 pic.twitter.com/NKMwYhqi4Z
— ABC SPORT (@abcsport) December 4, 2017
त्याचबरोबर जोन्सने सांगितले की त्याने इंस्टाग्रामवरून जॉनी बेअरस्टोशी संपर्क साधला होता. त्यावेळी सकाळी जेव्हा जोन्स ग्लोव्ज घेऊन मैदानाजवळ पोहोचल्याचे सांगताच बेअरस्टो २ मिनिटात तिथे येऊन त्याला भेटला. जोन्सने हेही सांगितले की बेअरस्टो हे ग्लोव्ज पाहून भावुक झाला होता. यानंतर त्यांनी जवळ जवळ ४५ मिनिटे गप्पा मारल्या.
The gloves which Jonny Bairstow was presented at breakfast which belonged to his dad pic.twitter.com/P0WaqFYzjc
— ABC SPORT (@abcsport) December 4, 2017
क्रिकेट फॅन जोन्सच्या वडिलांचे याच वर्षी जून २०१७मध्ये निधन झाले. आपल्या दिवंगत वडीलांच्या स्मरनार्थ जोन्सने जॉनी बेअरस्टोला ही भेट दिली होती.
A cricket fan has managed to track down Jonny Bairstow and give him keeper gloves signed by Jonny's late father in an emotional gift before today's play https://t.co/GqmoUaRObD | @Sporting_Tragic (Pic:AP/ABC) #Ashes pic.twitter.com/lglQ3osy6f
— ABC SPORT (@abcsport) December 4, 2017
बेअरस्टोने या भेटीबद्दल सांगितले होते की ” हे माझ्यासाठी खूप विशेष आहे. मी खरंच भाग्यवान आहे की मी कुठेही गेलो तरी मला माझ्या वडिलांबद्दलच्या अनेक आठवणी लोक सांगतात.”
वाचा- का केली होती जॉनी बेअरस्टोच्या वडिलांनी आत्महत्या