आज(13 आॅक्टोबर) श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोने यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे.
बेअरस्टो हा यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात 26 धावांची खेळी केली.
त्यामुळे त्याने आत्तापर्यंत यावर्षी वनडे क्रिकेटमध्ये 21 सामन्यात 48.61 च्या सरासरीने 1021 धावा पूर्ण केल्या आहेत. या 21 वनडे सामन्यात त्याने 4 शतके आणि 2 अर्धशतके केली आहे. त्याचबरोबर यावर्षी वनडेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
तो वनडेमध्ये एका वर्षात हजार धावा करणारा इंग्लंडचा सहावाच फलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडकडून डेव्हिड गोव्हर, ख्रिस ब्रॉड, इयान बेल, पॉल कॉलिंगहुड, जोनाथन ट्रॉट यांनी अशी कामगिरी केली आहे.
बेअरस्टो पाठोपाठ यावर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचाच जो रुट आणि जेसन रॉय हे दोऩ फलंदाज अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकाविरुद्धच्या या सामन्यात जो रुट(71) आणि इयान मॉर्गनने(92) अर्धशतक केले आहे. त्यांच्या या खेळीच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 278 धावा केल्या आहेत.
2018 या वर्षात कसोटीत एक हजार धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज-
भारताचा कर्णधार विराट कोहलीने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम नुकताच केला आहे. तो कसोटीत यावर्षी 1000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
2018 या वर्षात वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
1021 धावा – जॉनी बेअरस्टो (21 सामने)
896 धावा – जो रुट (21 सामने)
804 धावा – जेसन रॉय (19 सामने)
785 धावा – शिखर धवन (14 सामने)
749 धावा – विराट कोहली (9 सामने)
महत्वाच्या बातम्या-
- शानदार अर्धशतक करणाऱ्या पृथ्वी शॉचे नाव झाले या दिग्गजांच्या यादीत सामील
- १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर आयर्लंडच्या या दिग्गज खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती
- हैद्राबादच्या स्टेडियमवर मंदिर बांधल्यापासून टीम इंंडियाचा एकही पराभव नाही