असे म्हणतात की आयुष्य जगणे सोपे नाही. पण इथं व्यक्तीला आनंदही मिळत असतो. तर त्याला दुःखाशीही संघर्ष करावा लागतो. पण एक सामर्थ्यवान व्यक्ती तोच असतो जो संकटाच्या वेळी स्वत:ला सांभाळून आयुष्य बदलू शकतो. बर्याच वेळा त्याचा एकाकीपणा त्या व्यक्तीसाठी प्राणघातक ठरतो.
नैराश्यातून कोणी आपला जीव गमावला अशा बातम्या बर्याच वेळा आपल्याला ऐकायला मिळत असतात. अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतनेही (Sushant Singh Rajput) नैराश्यातून आत्महत्या केली आहे. नैराश्य हा एक असा आजार आहे. जो आपल्या मृत्यूचे कारण बनू शकतो.
इंग्लंड क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोचे (Jonny Bairstow) वडीलही या आजाराचे शिकार झाले आहेत. त्यांनी देखील फाशी घेऊन मरणाला कवटाळलं होतं.
जेव्हा वडिलांनी हे पाऊल उचलले तेव्हा बेअरस्टो अवघ्या आठ वर्षांचा होता. त्याच्या वडिलांचे नाव डेव्हिड बेअरस्टो (David Bairstow). ते देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यानी इंग्लंडकडून ४ कसोटी सामने तर २१ वनडे सामने खेळले आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ४५९ सामन्यांत १० शतकांसह १३९६१ धावा केल्या आहेत. ते सुमारे २० वर्षे यॉर्कशायरसाठी खेळले. परंतु त्यानंतर ते नैराश्यात गेले आणि वयाच्या ४६ व्या वर्षी म्हणजेच ५ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी आपले जीवन संपवले.
त्यावेळी डेव्हिड बेअरस्टो आर्थिक पेचप्रसंगाशी झगडत होते. दारू पिऊन गाडी चालवण्याचा गुन्हादेखील त्यांच्यावर नोंदविला गेला होता. १९९० मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते रेडिओ समालोचक झाले. परंतु ते सतत चिंतेत असायचे.
१९९७ मध्ये डेव्हिड बेअरस्टो यांनी जास्त प्रमाणात औषध घेऊन मृत्यूला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यावेळी कसे तरी वाचले. पण काही दिवसांनंतर त्यांनी घरातच गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
त्यांचा मुलगा जॉनी बेअरस्टोला अद्याप हे माहित नाही की त्याच्या वडिलांनी असं का केल. २०१७ मध्ये जेव्हा बेअरस्टोने हेडिंग्लेमध्ये आपल्या ‘ए क्लीयर ब्लू स्काय’ या पुस्तकाच्या प्रकाशनवेळी वडिलांच्या आत्महत्येबद्दल विधान केले. तेव्हा तो म्हणाला खरंच मला खरं कारण काय आहे हे माहित नाही.
होय मी याबद्दल काही काळ विचार केला.परंतु काही मुख्य कारण माहित नसल्यामुळे मी नंतर याबद्दल विचार करणे बंद केलं. मला माहित नाही की माझ्या वडिलांनी हे योग्य केले आहे की नाही. परंतु जेव्हा वडीलांचे निधन झाले. तेव्हा मीडियामध्ये अशा काही गोष्टी आल्या होत्या ज्या मला अजिबात ठीक वाटत नव्हत्या.
जॉनी बेअरस्टोने नंतर त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटमध्येच कारकिर्द घडवली. तो सध्या इंग्लंडच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू देखील आहे. तसेच २०१९ मध्ये विश्वचषक विजेतेपद जिंकलेल्या इंग्लंड संघातही त्याचा सहभाग होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
-भारतीय संघाचे ‘हे’ ३ धुरंदर फलंदाज; जे वनडेत ठोकू शकतात रोहितप्रमाणेच द्विशक
-अखेर त्या पंचांनी सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याची चूक केली मान्य
-सचिनला कर्णधार बनवणाऱ्या ‘या’दिग्गज खेळाडूंची आज ८१ वी जयंती