दक्षिण आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स ५ वर्षांपुर्वी म्हणजे २०१५मध्ये एका मुलीचा वडील बनला होता. त्याने आपल्या मुलीचे नाव अन्य काही न ठेवता इंडिया ठेवले होते. यावरुन दिसून येते की, जॉन्टीचे भारत देशावर किती प्रेम आहे. आता जॉन्टीने स्वत: त्याच्या भारतावरील प्रेमामागचे कारण सांगितले आहे. एका व्हिडिओद्वारे जॉन्टीने या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
जोन्टीने त्याचा हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट केला आहे. त्याला कॅप्शन देत जॉन्टीने लिहिले, “लोक मला नेहमी विचारत असतात की, भारताबद्दल असं काय आहे जे मला खूप जास्त आवडत? मला अजूनही काही सांगण्याची गरज आहे का?”
या व्हिडिओमध्ये काही लोक क्वारंटाइन सेंटरमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहेत. पण, अजूनही ही गोष्ट समोर आलेली नाही की हा व्हिडिओ नक्की कुठे शूट केला होता? या व्हिडिओला आतापर्यंत ३६ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर, २ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाईक आणि ५००पेक्षा जास्त लोकांनी कमेंट केले आहे.
People ask me often; “what is it about India that I love so much” Need I say any more? https://t.co/QSsQfJOqIl pic.twitter.com/QdzIviTxMT
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) June 10, 2020
या व्हिडिओला बुधवारी (१० जून) जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शेअर केले होते. अब्दुल्ला यांनी कॅप्शनममध्ये लिहिले की, “जागा आहे, खेळणार. क्वारंटाइन टाइमपास.” परंतु, त्यांनीही या गोष्टीची माहिती दिली नाही की, हा व्हिडिओ नक्की कुठे शूट केला गेला?
दक्षिण आफ्रिकाकडून ५२ कसोटी आणि २४५ वनडे सामने खेळणाऱ्या जॉन्टीने १६ एप्रिल १९९४ला केट मेकार्टीसोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. परंतु, काही वर्षांनंतर केट मॅककार्थी आणि जॉन्टी हे वेगळे झाले. त्यानंतर २०१४ला जॉन्टीने मेलेनी वोल्फसोबत लग्न केले. २०१५मध्ये त्यांना मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी इंडिया असे ठेवले आहे.
तेव्हा जॉन्टी म्हणाला होता की, “त्याने भारताच्या समृद्ध संस्कृती, वारसा आणि पंरपरेच्या प्रेरणेतून आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवले होते.” जॉन्टी नेहमी भारतात फिरण्यासाठी येत असतो. त्याला भारतातील आध्यात्मिक ठिकाणे आवडतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
जेव्हा पंड्याने घेतल्या होत्या ३ चेंडूत ३ विकेट्स, तेव्हाची ‘धोनी रणनिती’ आली जगासमोर
भारताविरुद्ध ‘तो’ २८० धावांवर असताना कर्णधाराने डाव घोषीत…
अक्रम, वकार अन् अख्तरची धुलाई करणारा ‘हा’ भारतीय फलंदाज…