अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी त्याने या फॉरमॅटमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. चेस्टर ली स्ट्रीटवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याला कोणतीही मोठी खेळी करता आली नसली तरी चाहते खूप भावूक आणि नाराज झाले होते. इतकेच नाही तर स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा स्टोक्सही भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्टोक्सच्या या निर्णयावर अनेक क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी दु:ख व्यक्त केले. दरम्यान, इंग्लंडचा वनडे आणि टी-२० कर्णधार जोस बटलरने स्टोक्सचे कौतुक केले. बटलर म्हणाला की, एकदिवसीय फॉरमॅटमध्ये या अष्टपैलू खेळाडूची उणीव नेहमीच जाणवेल.
इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार जोस बटलरने बेन स्टोक्सची एकदिवसीय फॉर्मेटमध्ये उणीव भासणार असल्याचे म्हटले आहे. बटलरने बेन स्टोक्सला पिढ्यानपिढ्या जन्माला आलेला खेळाडू म्हणून वर्णन केले तर माजी कर्णधार इऑन मॉर्गनने अष्टपैलू खेळाडूला खरा नेता म्हणून वर्णन केले. इंग्लंडच्या २०१९च्या विश्वचषक विजयाचा नायक असलेल्या स्टोक्सने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केल्याने क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडाली आहे.
बेन स्टोक्सने शेवटचा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरहम येथील त्याच्या घरच्या मैदानावर खेळला, त्यात त्याने केवळ ५ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडचा ६२ धावांनी पराभव झाला. सामन्यानंतर बटलर म्हणाला, ‘बेनसारखा खेळणारा खेळाडू पिढ्यानपिढ्या जन्माला येतो. त्यामुळे त्याच्याशिवाय सर्वोत्तम कामगिरी करणे आमच्यासाठी (ODI संघ) आव्हान असेल.
“आम्हाला त्याची आठवण येईल आणि इंग्लंडचा चाहता म्हणून हे कडू घोट घेण्यासारखे आहे. या (ODI) फॉरमॅटमध्ये आम्हाला बेनची सेवा मिळणार नाही हे खरोखरच दुःखद आहे पण एकदिवसीय क्रिकेटच्या तोट्याचा इंग्लंडला कसोटी क्रिकेटमध्ये नक्कीच फायदा होईल.
माजी कर्णधार मॉर्गनलाही स्टोक्सच्या वनडेतून निवृत्तीचे दुःख झाले आहे. “काहीही शक्य आहे याची खात्री देणारा तो खरा नेता आहे,” तो म्हणाला. इतकी वर्षे त्याच्यासोबत खेळताना खूप आनंद होत आहे आणि वयाच्या ३१व्या वर्षी निवृत्ती घेतल्याचे दुःख आहे. स्टोक्स टी-२० मध्ये खेळत राहणार आणि कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने एजबॅस्टन येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या कसोटीत भारताचा पराभव केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयसीसी वनडे क्रमवारी जाहीर, पाहा विराट-रोहित आहेत कोणत्या स्थानावर?
Historic Win। काय तो धोनी, काय ते लॉर्ड्स चे ग्राऊंड अन् काय तो इशांत शर्मा, भारत ओक्के मंधी हाय!