टी20 विश्वचषकाला (T20 World Cup) काहीच दिवस शिल्लक असल्याने अनेक संघ टी20 मालिका खेळत आहे. यातच इंग्लंड पुरूष क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सात सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलर करणार आहे. या मालिकेत इंग्लंड संघ खेळण्याबरोबरच पाकिस्तानमध्ये आलेल्या पूरग्रस्तासाठी मदत करणार आहे. इंग्लंडचा संघ 17 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे.
जोस बटलर (Jos Buttler) म्हणाला, “पाकिस्तानचे लोक पूराचा सामना करत आहे. त्यासाठी आम्ही एक संघाच्या रूपात काही रक्कम दान करत आहोत. एवढीच रक्कम इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड देणार आहे. हा गरजू लोकांसाठी छोटी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच रोमांचक क्रिकेट खेळून लोकांचा उत्साह वाढवण्याची अपेक्षा आहे.”
बटलरबरोबर इंग्लंडचे काही खेळाडू पहिल्यांदाच पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले आहेत. तसेच संघपुनरागमन करणारे ऍलेक्स हेल्स, मोईन अली आणि लियाम डॉसन हे पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळले आहेत.
इंग्लंडने 2005 मध्ये पाकिस्तानमध्ये शेवटचा सामना खेळलेला. त्यावेळी तीन कसोटी आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळली गेली. या दोन्ही मालिका पाकिस्ताननेच जिंकल्या होत्या. तसेच इंग्लंडचा संघ मागील वर्षीच पाकिस्तानचा दौरा करणार होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने, इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही माघार घेतली होती.
बेन स्टोक्स, क्रिस जॉर्डन आणि लियाम लिविंगस्टोन यांनी या दौऱ्यातून माघार घेतली असून हे तिघेही टी20 विश्वचषकाच्या इंग्लंड संघाचा भाग आहेत. या दौऱ्यात इंग्लंड 20 ते 25 सप्टेंबरपर्यंत कराची येथे चार आणि बाकी तीन सामने लाहोर येथे खेळणार आहेत. हे सामने 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान खेळले जाणार आहेत. आगामी T20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. इंग्लंडचा संघ डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पुन्हा एकदा पाकिस्तानात दाखल होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! सॅमसन बनला भारताचा कर्णधार, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मिळाली जबाबदारी
बाबर आझमच्या टेंशनमध्ये वाढ, पाकिस्तानच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी दिवसेंदिवस होतेयं मोठी
नऊ वर्षात मुंबई इंडियन्सने 4 गुरु बदलले, पण दुनिया हलवायला संघाचा ‘सेनापती’ एकच