टी-२० विश्वचषकाचे जेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहे. टी-२० विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ८ डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी ५ कसोटी सामन्यांची ऍशेज मालिका सुरू होणार आहे. इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज जॉस बटलरने या मालिकेसाठी सुरू असलेल्या तयारीविषयी माहिती दिली आहे. बटरलने यावेळी ऍशेज मालिकेत भारताच्या रिषभ पंतप्रमाणे खेळण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे.
मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात रिषभ पंतने ज्याप्रक्रारची फलंदाजी केली होती, त्याचे बटलरने कौतुक केले आहे. बटलरच्या मते रिषभ पंत निर्भिड होऊन फलंदाजी करतो आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली होती, ती अप्रितम होती. आगामी काळातील ऍशेज मालिकेत रिषभ पंतप्रमाणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल, असेही बटलर पुढे बोलताना म्हणाला आहे.
‘द टेलिग्राफ’शी चर्चा करताना बटलर म्हणाला की, “ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात मला एका खेळाडूला खेळताना पाहायला खूप आवडले, तो होता रिषभ पंत. ज्याने मागच्या वर्षी हिवाळ्यात सर्वांचेच मन जिंकले. मला त्याची खेळण्याची पद्धत खूप आवडली. तो ज्याप्रकारे त्याच्या डिफेंसिव बाजूला आक्रमक बाजूमध्ये बदलतो, हा तो निर्भिड असण्याचा पुरावा आहे. मी देखील टी-२० विश्वचषकातील माझ्या आक्रमक अंदाजात ऍशेज मालिकेत निर्भिडपणे खेळण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ असा नाही की, मी सरळ ऑल आउट अटॅकवर जाईल. पण या वृत्तीने खूप अडचणी दूर होतील. आम्हाला गोष्टी सोप्या ठेवणे गरजेचे आहे, फक्त चेंडू बॅटवर लावायचा आहे.”
दरम्यान, टी-२० विश्वचषकात इंग्लंडने चांगल्या प्रकारचे प्रदर्शन केले आणि उपांत्य सामना गाठला होता. मात्र, उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून त्यांना पराभव मिळाला. इंग्लंडच्या टी-२० विश्वचषकातील प्रवासाविषयी बोलताना बटलर म्हणाला की, “इंग्लंड संघ यूएईमध्ये खूप अपेक्षांसोबत आला होता. पण ज्या ठिकाणी शेवट करू इच्छित होता, त्यापेक्षा थोडे मागे राहिला.”
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाचे ‘हे’ २ खेळाडू ठरू शकतात हुकमी एक्के
INDvNZ, Live: पहिल्या टी२०च्या नाणेफेकीचा कौल भारताच्या पारड्यात, वेंकटेश अय्यरचे पदार्पण