---Advertisement---

‘दडपणाखाली होतो, पण त्याच्या प्रेरणादायी शब्दांनी मदत केली’, बटलरने ‘या’ दिग्गजाला दिले यशाचे श्रेय

Jos-Buttler
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ मध्ये अनेक खेळाडूंनी प्रभावित केले आहे. अनेक नवीन खेळडूंनी यंदाच्या हंगामात आपली चमक दाखवली आहे. शिवाय अनेक प्रतिष्ठीत खेळाडू आपले नाव गाजवण्यात अयशस्वी ठरले आहेत. मात्र असे असतानाही राजस्थानचा सलामी फलंदाज जॉस बटलरने आपले कतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. यावर्षी बटलरने अंतिम सामन्याच्या आधीपर्यंत १६ सामन्यांत ८२४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ४ शतकांचा समावेश आहे. मात्र बटलरने या यशाचे श्रेय संघाचा प्रशिक्षक कुमार संगाकाराला दिले आहे.

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) खुलासा केला आहे की, “आयपीएल २०२२ च्या हंगामाच्या मध्यांत मी खूप दडपणाखाली होतो, परंतु संघाचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराच्या (Kumar Sangakara) प्रेरणादायी शब्दांनी मला स्वतःसाठी एक मार्ग शोधण्याची संधी दिली. मी येथे फार कमी अपेक्षा घेऊन आलो होतो, पण संघाच्या शेवटच्या सामन्यांमध्ये विजयामुळे अंतिम फेरी गाठण्यात मदत झाली. मी जेव्हा कधी जवळ जायचो तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट असायची आणि ती म्हणजे संघासाठी धावा करणे. आणि या सगळ्यात मला संगाकाराने विशेष मदत केली

बटलरने दिवंगत शेन वॉर्नला (Shane Warne) श्रद्धांजली वाहिली आणि म्हटले की, “ऑस्ट्रेलियन दिग्गज संघासाठी प्रभावशाली आहे.  टी२० क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. शेन वॉर्न राजस्थानसाठी प्रभावी व्यक्ती आहे. आम्हाला त्याची खूप आठवण येईल. आम्ही अंतिम सामना जिंकणे हीच वॉर्नला खरी श्रद्धांजली ठरेल”, असे म्हणत बटलरने शेन वॉर्नसाठीचे प्रेम व्यक्त केले. 

दरम्यान, सलामीवीर बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सात गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या या क्रिकेटपटूने १७७ च्या स्ट्राईक रेटने ६० चेंडूत नाबाद १०६ धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. २९ मे रोजी आयपीएल २०२२चा अंतिम सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघात खेळला जाईल. 

व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

IPL 2022 | जोस बटलरने पाडला षटकारांचा पाऊस, तर ‘या’ खेळाडूने मारला सर्वात लांब षटकार

गोलंदाजीसाठी ७ पर्याय ते फिनिशर्सची भरमार, ‘या’ ५ गोष्टी गुजरातला बनवू शकतात चॅम्पियन

IPL फायनलमध्ये राजस्थानसाठी बटलरची फलंदाजीच नाही, तर ‘या’ ५ गोष्टीही ठरू शकतात जमेची बाजू 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---