सध्या भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्याची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला. पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला, तर दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात तिलक वर्माच्या (Tilak Varma) दमदार खेळीमुळे भारताने 2 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला गेला. तत्पूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) दुसऱ्या टी20 सामन्यात मोठा पराक्रम केला.
दुसरा टी20 सामना सुरू होण्यापूर्वी, जोस बटलरने (Jos Buttler) भारताविरुद्ध टी20 सामन्यांमध्ये 566 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याने 45 धावांची खेळी खेळली. यासह, बटरलच्या आता भारताविरुद्ध 611 टी20 धावा झाल्या आहेत, ज्यामुळे तो या फाॅरमॅटमध्ये भारताविरुद्ध 600 धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. या सामन्यात बटलरने आपल्या 45 धावांच्या खेळीत 3 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार लगावले.
जोस बटलर (Jos Buttler) भारताविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. जोस बटलरने वेस्ट इंडिजचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरनला (Nicholas Pooran) मागे टाकत हा पराक्रम केला. पूरनने भारताविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 592 धावा केल्या आहेत.
भारताविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज-
जोस बटलर – 611
निकोलस पूरन – 592
ग्लेन मॅक्सवेल – 574
डेव्हिड मिलर – 524
आरोन फिंच – 500
जोस बटलरच्या (Jos Buttler) टी20 आंतरराष्ट्रीय कारिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने इंग्लंडसाठी 131 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 3,502 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 36.10 राहिली आहे, तर स्ट्राईक रेट 147.20 आहे. टी20 मध्ये त्याने 26 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 101 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोणत्या भारतीय फलंदाजाने प्रजासत्ताकदिनी झळकावले होते शतक?
‘या’ स्टार खेळाडूने जिंकला ‘आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार..!
संघाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघातून बाहेर पडला ‘हा’ खेळाडू