---Advertisement---

वडील होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, तरीही ‘हा’ खेळाडू उतरला मैदानावर आणि बनला मॅच विनर

On: रविवार, ऑगस्ट 9, 2020 9:20 PM
---Advertisement---

मँचेस्टर। इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने पाकिस्तान संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात कठीण वेळी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात २७७ धावांचा विजयासाठी पाठलाग करत असताना ख्रिस वोक्ससोबत १३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत ७५ धावांची खेळी केली तसेच हातातून निसटता सामना संघाला जिंकून दिला.

तरीही बटलरसाठी हे खूपच कठीण होते. त्याने सामन्यात यष्टीरक्षणावेळी अनेक चूका केल्या त्यामुळे तो दबावात होता. त्याचबरोबर त्याला आपल्या वडिलांचीही चिंता होती. बटलरला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री १० वाजता सांगण्यात आले होते की, त्याच्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

रुग्णालयात दाखल होते वडील

खरं तर बटलरच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. बटलरच्या शानदार खेळीनंतर त्याच्या बहिणीने ट्वीट करत त्याची प्रशंसा केली होती, तसेच कर्णधार जो रूटनेही प्रशंसा करत म्हटले, “मला माहिती आहे त्याच्यासाठी हे खूप कठीण राहिले असेल. हे त्याचे कौशल्य आहे की, दबावातही तो आणखी चांगली कामगिरी करतो. तो मैदानावरील दबाव सहजपणे पेलतो. परंतु मैदानाबाहेरचा दबाव झेलने त्याच्यासाठी सोपे नाही. मला वाटते की त्याची ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण खेळींमध्ये सामील होईल.”

बटलरला आहे आपल्या फलंदाजीवर अभिमान

सामन्यानंतर बटलर म्हणाला, “मला अभिमान आहे. जर मी यष्टीरक्षणात त्या संधी गमावल्या नसत्या, तर आम्ही २ तासांपूर्वीच आम्ही सामना जिंकला असता. मला माहीत होते की मी चांगले यष्टीरक्षण केलेले नाही. मी अनेक झेल सोडले आणि जरी तुम्ही कितीही धावा केल्या तरीही, तरी अशा वेळी तुम्ही धोका पत्करू शकत नाहीत.”

“डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी येत राहतात की, जर मी तेवढ्या धावा केल्या नाहीत, तर कदाचित मी माझा शेवटचा सामना खेळत आहे. परंतु तुम्हाला या सर्व गोष्टी विसरून आपला खेळ खेळावा लागतो,” असेही तो पुढे म्हणाला.

वोक्ससोबतच्या आपल्या भागीदारीबद्दल बटलर म्हणाला, “आम्ही वनडेत धावांचा पाठलाग करतोय असे वाटले आणि प्रत्येक षटकात चार धावा केल्या. आम्हाला एक चांगली लय मिळाली आणि चांगली भागीदारी केली.”

महत्त्वाच्या बातम्या-

-पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही स्टोक्स; जाणून घ्या कारण…

-दुखापतग्रस्त नसूनही वेस्ट इंडिजचा ‘हा’ खेळाडू सीपीएलमधून बाहेर; कारण जाणून दंग व्हाल…

-‘बुमराह त्याच्या गोलंदाजी ऍक्शनमुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळू शकणार नाही,’ माजी दिग्गजाने केले वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

-वयाची चाळीशी ओलांडली तरी कसोटी क्रिकेट खेळणारे ४ भारतीय दिग्गज

-असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…

-५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---