इंग्लंड रविवारी (13 नोव्हेंबर) आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 चा विजेता बनला. इंग्लंडसाठी ही त्यांची टी-20 विश्वचषकातील दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी 2010 साली इंग्लंडने त्यांचा पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता. पॉल कॉलिंगवुड यांच्या नेतृत्वात इंग्लंडने पहिला विश्वचषक जिंकला होता, तर यावर्षी त्यांचे नेतृत्व जोस बटलर करत आहे. बटलर सध्या 32 वर्षाचा असून विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने एका खास यादीत स्वतःला सामील करून घेतले आहे.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात एमएस धोनी (MS Dhoni) स्वतःच्या संघाला विजेतेपद मिळवून देणारा सर्वात युवा कर्णधार ठरला होता. त्याने विश्वचषकाचा पहिला हंगाम म्हणजेच 2007 साली भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. तेव्हा धोनीचे वय अवघे 26 वर्ष आणि 79 दिवस होते. धोनीचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे. त्याच्यापेक्षा कमी वयात एकाही कर्णधाराने स्वतःच्या संघाला विजेतेपद मिळवून दिले नाहीये. कमी वयात टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्यांच्या यादीत वेस्ट इंडीजचा डॅरेन सॅमी (Darren Sammy) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने वयाच्या 28 वर्ष आणि 292 दिवस पूर्ण झालेले असताना विश्वचषक जिंकला.
यादीत तिसरा क्रमांक लिसिथ मलिंग (Lasith Malinga) आहे. मलिंगाने 30 वर्ष आणि 221 दिवस वय असताना श्रीलंकेला टी-20 विश्वचषक जिंकला होता. यादीत चौथ्या क्रमांकावर युनील खान (Younis Khan) आहे, ज्याने 31 वर्ष आणि 204 दिवस वय असताना पाकिस्तनला विजेतेपद मिळवून दिले होते. यादीत पाचव्या क्रमांकावर जोस बटलर (Jos Buttler) याचे नाव जोडले गेले आहे. बटलरने 32 वर्ष आणि 66 दिवसांच्या वयात इंग्लंडला टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले आहे.
टी-20 विश्वचषक जिंकणारे युवा कर्णधार
26 वर्ष 79 दिवस – एमएस धोनी
28 वर्ष 292 दिवस – डॅरेन सॅमी
30 वर्ष 221 दिवस – लसिथ मलिंगा
31 वर्ष 204 दिवस – युनिस खान
32 वर्ष 66 दिवस – जोस बटलर
दरम्यान, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकांमध्ये पाकिस्तान संघ 8 विकेट्सच्या नुकसानावर 137 धावा करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांमध्ये पाच विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये एकही भारतीय नाही, ‘हे’ आहेत टॉप 5
याला म्हणतात ताकद! हे पाच हुकमी एक्के नसतानाही इंग्लंड बनलाय जगज्जेता