---Advertisement---

बेन स्टोक्सच्या निवृत्तीचे पडसाद! आता ‘या’ दिग्गज खेळाडूने क्रिकेटच्या बिजी स्केड्युलबाबत व्यक्त केली चिंता

On: सोमवार, जुलै 25, 2022 5:40 PM
Rohit Sharma and Quinton de Kock
---Advertisement---

क्रिकेटविश्वातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक आता चर्चेचा विषय बनत चालला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने वनडेतून निवृत्ती घेतल्यानंतर या चर्चेला तर अजून जोर धरला आहे. त्याच्या निवृत्तीनंतर अनेक खेळाडूंनी पुढे येत क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाबाबत आपापली मते व्यक्त केली आहेत. त्यामध्ये आता दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकचीही भर पडली आहे.

इंग्लंड संघाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका केली होती. आता दक्षिण आफ्रिका संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) यानेही व्यस्त वेळापत्रकात आपली बाजू मांडत म्हटले, “व्यस्त वेळापत्रकात अजून काही सामन्यांची भर पडली तर खेळाडूंना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये खेळणे अशक्य आहे.”

डी कॉकने मागील वर्षीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने म्हटले, “खेळाडूंना त्यांचे वैयक्तिक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. ते जर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये खेळू इच्छिता तर अशा खेळाडूंसाठी मी खुश आहे. मात्र काहींना तो निर्णय स्वत: घेण्याची वेळ आली आहे.”

“जेव्हा तुम्ही एक युवा खेळाडू असता तेव्हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळून कामगिरी उंचावण्याचे तुमचे लक्ष्य असते. मात्र जेव्हा वय वाढत जाते तेव्हा शरीर साथ देत नसल्याने कठीण होत जाते. त्यावेळी तुम्ही कसे नियोजन करता हे म्हत्वाचे असते,” असेही डी कॉकने पुढे म्हटले आहे

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका निर्णायक सामना पावसामुळे रद्द झाल्यावर बटलर म्हणाला, “व्यस्त वेळापत्रकाबाबत माझे काही मत नाही, मात्र मला एकच खंत आहे ती म्हणजे, सामना खेळण्यापूर्वी कोणताही प्रशिक्षण दिवस दिला जात नाही. तर संघासाठी प्रशिक्षण, सराव करणे महत्वाचे असते.”

बेन स्टोक्सच्या वनडे निवृत्तीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैेन यांनी थेट आयसीसीला (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) जबाबदार धरले होते. तर पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी स्टोक्सच्या निर्णयाचे समर्थन करताना तर ‘वनडे क्रिकेट बंद करा’, असे विधान केले. तसेच ऑस्ट्रेलियाचा सलामीवर उस्मान ख्वाजाने वनडे क्रिकेट हळूहळू  शेवटाकडे जात आहे, असे मत व्यक्त केले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

एका सामन्यात खेळलेले चार विकेटकीपर, एक पठ्ठ्या ४५ व्या वर्षी ग्लोव्हज घालून उतरला मैदानात

टीम इंडियाच्या आयसीसी ट्रॉफीच्या अपयशाचे कारण शास्त्री गुरूजींनी केले स्पष्ट; म्हणाले,” जर संघात तो…”

यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---