ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात जॉस बटलर संघात नसेल. त्याने वैयक्तिक कारणास्तव जैव-सुरक्षित बबल सोडला आणि कुटुंबाकडे गेला. तो एक असा खेळाडू आहे ज्याने दोन टी20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यास मोलाचे योगदान दिले. शेवटच्या टी -20 सामन्यात त्याने नाबाद 77 धावा केल्या आणि सामनावीर ठरला.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जॉस बटलरच्या संघाबाहेर जाण्याला दुजोरा दिला आणि म्हणाले की, “तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत तुला परत यावे लागेल.”
शुक्रवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ओल्ड ट्रॅफर्ड येथे तीन वनडे सामन्यांची मालिका खेळतील.
टी20 मालिकेत जोस बटलरने केली उत्तम खेळी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात इंग्लंडने 2 धावांनी विजय मिळवला. त्यात जॉस बटलरने 44 धावा केल्या. दुसर्या सामन्यात त्याने 54 चेंडूत नाबाद 77 धावा केल्या. त्याने इंग्लंड संघाला जबरदस्त षटकारासह सामना जिंकून दिला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
सामन्यानंतर मिशेल स्टार्कनेही म्हटले की, “जॉस बटलरला रोखण्यासाठी आम्हाला नवीन रणनीती आखण्याची गरज आहे. सलग दोन सामन्यात धावा करणारा फलंदाज म्हणजे टी20 क्रिकेटमधील एक सामर्थ्यवान फलंदाज आहे.”
जॉस बटलरशिवाय टी20 मालिकेत इंग्लंडकडून डेव्हिड मलानने एक उत्कृष्ट खेळ केला. पहिल्या सामन्यात 66 धावा करणाऱ्या मलानने दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देत 42 धावा केल्या. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी खेळला जाईल.