द हंड्रेड या इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या भवितव्याबद्दल बोलताना जॉस बटलरचा विश्वास आहे की द हंड्रेड हा इंग्लिश देशांतर्गत क्रिकेटच्या भविष्याचा एक मोठा भाग आहे. आयपीएलनंतर इंग्लंडमध्ये जगातील दुसरी मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू करण्याची विनंतीही जॉस बटलरने ईसीबीला केली.
काही जुन्या वृत्तांनुसार इसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड आणि चेअरमन रिचर्ड थॉम्पसन हंड्रेडचे स्वरूप बदलणे किंवा टी20 ब्लास्टमध्ये विलीन करणे शक्य आहे का यावर विचार करत होते. आता टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जॉस बटलरने (Jos Buttler) हंड्रेड स्पर्धेचे समर्थन केले आहे.
बटलर म्हणाला की, “मला माहित आहे की, इंग्लंडमध्ये ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. आमच्याकडे काउंटी प्रणाली आहे, जी इतके दिवस विलक्षण आहे. परंतु, खेळाची बदलती दिशा पाहता मला वाटते की शंभर चेंडू हा आमच्या इंग्लंडमधील भविष्याचा मोठा भाग आहे . शंभर चेंडू असो किंवा टी20 किंवा काहीही असो मला वाटते की आपल्याला जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्कृष्ट देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याची गरज आहे. साहजिकच आयपीएल नंबर 1 असेल, पण मला वाटते की आमच्याकडे दुसरी सर्वोत्कृष्ट देशांतर्गत स्पर्धा सुरू होऊ शकते. हे सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल ते करणे आवश्यक आहे आणि माझ्यासाठी ही एक छोटी, फ्रँचायझी स्पर्धा आहे.”
पुढे इंग्लिश फलंदाज म्हणाला की, “युवा खेळाडूंना संधींचे महत्त्व समजले आहे. द हंड्रेडच्या माध्यमातून काही संघ प्रतिभा गोळा करताना दिसत आहे. आम्ही बर्याच प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिले आहे. खेळाडू केव्हा कामगिरी करतात याची आपल्याला चांगली माहिती मिळते. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.”
पुढे तो म्हणाला, “आयपीयल हे गेल्या अनेक वर्षांपासून याचे एक उत्तम उदाहरण आहे. जर तुम्ही त्यात चांगली कामगिरी करू शकलात, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही ते घडवू शकता. आम्ही तरुण भारतीय खेळाडूंना असे संक्रमण करताना पाहिले आहे. त्यामुळे मला असे वाटते. या देशात आमच्यासाठी खरोखरच रोमांचक गोष्ट आहे. आमच्याकडे अशी स्पर्धा असू शकते जी खरोखर चांगला बदल घडवू शकते. (jos buttler told ipl is world no1 cricket league)
महत्वाच्या बातम्या-
“धोनीने रोहितला 2011 वर्ल्डकपसाठी डावललेले”, माजी निवडसमिती सदस्याचा धक्कादायक खुलासा
अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये जयपूर पॅट्रीओट्स या नव्या फ्रँचायझीची एन्ट्री